जगभरात लसीकरण मोहिमेतंर्गत ९ अब्ज डोस

ब्रिटनमध्ये प्रवाशांच्या नियमात बदल; श्रीलंकेतही मुलांचे लसीकरण
vaccination
vaccinationesakal

वॉशिंग्टन : जगभरात कोरोनाचा (Corona) पुन्हा वेगाने फैलाव होत आहे. जॉन्स हॉपकिन्स यूनिव्हर्सिटीच्या मते, जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या ही २९७ दशलक्षपेक्षा अधिक झाली असून कोरोनामुळे आतापर्यंत ५.४६ दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात ठिकठिकाणी लसीकरण (Vaccination) मोहीम वेगाने राबविली जात असून बुधवारपर्यंत ९.२७ अब्ज डोस देण्यात आले. ओमिक्रॉनमुळे अनेक देशांत लॉकडाउनची (Lockdown) स्थिती निर्माण झाली आहे तर काही ठिकाणी निर्बंध कडक केले आहेत.

जॉन्स हॉपकिन्स युनिव्हिर्सिटीच्या सेंटर फॉर सिस्टिम सायन्स ॲड इंजिनिअरिंगने म्हटले की, कोरोनाचा सामना करण्यासाठी आतापर्यंत ९ अब्ज २४ कोटी ७८ लाखाहून अधिक डोस देण्यात आले आहे. जगात सर्वाधिक बाधित रुग्ण अमेरिकेत असून तेथे ५ कोटी ७० लाख जणांना लागण झाली आहे. त्याचवेळी ८ लाख ३० हजाराहून अधिक नागरिकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

vaccination
मरवडे विषबाधा प्रकरण : दोन आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी

ब्रिटनमध्ये प्रवासी नियमात बदल करण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये परदेशातून आलेल्या नागरिकांना मायदेशी परतण्यापूर्वी तपासणी करण्याची अट शिथिल केली आहे. त्याचबरोबर परदेशातून आलेल्या नागरिकांना विलगीकरणात राहण्याची देखील गरज नसल्याचे ब्रिटन सरकारने म्हटले आहे.

श्रीलंकेत १२ ते १५ वयोगटातील लसीकरण

श्रीलंकेत येत्या ७ जानेवारीपासून १२ ते १५ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होणार आहे. आरोग्य मंत्री केहेलिया रामबुक्वेला यांनी यासंदर्भातील माहिती दिली. श्रीलंकेच्या एकुण लोकसंख्येच्या सुमारे ७० टक्के जणांना चीनची सिनोफार्म लशीचे डोस दिले आहेत. मुलांना फायजर लस दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

vaccination
मोठा निर्णय! विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या खर्चाची मर्यादा वाढणार

१८४ देशांत ९.२९ अब्ज डोस

कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी जगात लसीकरण मोहिम सुरू आहे. कालपर्यंत ९.२९ अब्ज डोस दिले असून यानुसार दररोज ३५ दशलक्ष डोस दिले जात आहेत. अमेरिकेत आतापर्यंत ५०८ दशलक्ष डोस दिले असून तेथे गेल्या आठवड्यात दररोज १.४१ दशलक्ष डोस दिले गेले.

देश डोस

  • चीन २.८६ अब्ज

  • भारत १.४९ अब्ज

  • अमेरिका ५०८ दशलक्ष

  • ब्राझील ३३३ दशलक्ष

  • रशिया १४७ दशलक्ष

  • ऑस्ट्रेलिया ४३ दशलक्ष

  • ब्रिटन १३४ दशलक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com