माणुसकीचा झरा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

मी ‘स्ट्रिंग थिअरी’ या विषयावर काम करतो. आइनस्टाईनचा सापेक्षवादाचा सिद्धांत आणि क्वांटम थिअरीला एकत्र आणण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. ते करतानाची तर्कदुष्टता दूर करण्यासाठी आम्हाला स्टीफन हॉकिंग यांच्या कृष्णविवरांसंदर्भातील संशोधनाचा उपयोग होत आहे. हॉकिंग यांच्या सिद्धांतानुसार कृष्णविवरातून सतत मंद प्रकाश तेवत असतो. त्याच्या विशिष्ट तापमानाला ‘हॉकिंग तापमान’ म्हणून ओळखले जाते.

कृष्णविवराच्या आतमध्ये काय चालू आहे, हे त्याच्या पृष्ठभागावरून ओळखता येते व त्यासाठी ‘हॉकिंग तापमाना’चा सर्वाधिक उपयोग होतो. ही पद्धत ‘होलोग्राफी’ नावाने ओळखली जाते. 

हॉकिंग यांच्याशी माझा संबंध १९९५मध्ये कॅलिफोर्नियामध्ये असताना आला. त्यांचे कार्यालय माझ्या कार्यालयाशेजारीच होते व मी स्ट्रिंग थिअरीसंदर्भातील एक सूत्र शोधल्याचे त्यांना समजले होते. हे सूत्र काय आहे, हे जाणून घेण्यासाठी हॉकिंग व्हीलचेअर चालवत माझ्या कार्यालयात आणि त्यांनी माझ्याशी चर्चा केली. मशिनवर टाइप करून मला प्रश्‍नही विचारले. मी त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे ब्लॅक बोर्डवर लिहून देत होतो. हा अविस्मरणीय अनुभव होता. त्यानंतर मी त्यांना भारतामध्ये २००१मध्ये भरलेल्या ‘स्ट्रिंग कॉन्फरन्स’साठी बोलावले व त्यांनी हे आमंत्रण स्वीकारले. भारतीय वैज्ञानिकांचे या क्षेत्रातील काम पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले व त्यानंतर या संशोधनात सक्रिय सहभागही घेतला.

हॉकिंग यांच्यातील माणुसकी वाखाणण्यासारखी होती. त्यांच्या जाण्याने संशोधन क्षेत्राचे नुकसान झाले असले, तरी त्यांनी मांडलेल्या संकल्पनांवर आम्हा संशोधकांना आणखी वीस वर्षे काम करावे लागणार आहे. 
- आतिश दाभोळकर, भौतिकशास्त्रातील संशोधक, फ्रान्स

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: global news stephen hawking dies article aatish dabholkar