ब्रिफ हिस्टरीमागील हिस्टरी!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

न्यूयॉर्क टाइम्स नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर मी स्टीफन हॉकिंग यांना पहिल्यांदा पाहिले. आतील पानांमध्ये विश्‍वनिर्मितीचे गूढ उकलणाऱ्या आणि दुर्धर आजारामुळे व्हीलचेअरला खिळलेल्या या खगोलभौतिकशास्त्रज्ञावर लेख होता. एकदा दुपारी जेवताना योगायोगाने मी अल झुकेरमन या लिटररी एजंटला या लेखाबद्दल सांगितले. तेव्हा तो पुस्तक लिहिण्याविषयी हॉकिंग यांच्याशी बोलण्यासाठी संपर्क साधण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्याने सांगितले. काही महिन्यांनी ‘ए ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम’च्या प्रकाशनासाठी लिलावात सहभागी होण्यासाठीचे निमंत्रण असलेली एक चिठ्ठी मला झुकेरमनकडून मिळाली.

न्यूयॉर्क टाइम्स नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर मी स्टीफन हॉकिंग यांना पहिल्यांदा पाहिले. आतील पानांमध्ये विश्‍वनिर्मितीचे गूढ उकलणाऱ्या आणि दुर्धर आजारामुळे व्हीलचेअरला खिळलेल्या या खगोलभौतिकशास्त्रज्ञावर लेख होता. एकदा दुपारी जेवताना योगायोगाने मी अल झुकेरमन या लिटररी एजंटला या लेखाबद्दल सांगितले. तेव्हा तो पुस्तक लिहिण्याविषयी हॉकिंग यांच्याशी बोलण्यासाठी संपर्क साधण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्याने सांगितले. काही महिन्यांनी ‘ए ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम’च्या प्रकाशनासाठी लिलावात सहभागी होण्यासाठीचे निमंत्रण असलेली एक चिठ्ठी मला झुकेरमनकडून मिळाली. त्या वेळी मी ‘बॅंटम बुक्‍स’मध्ये वरिष्ठ संपादक होतो. आम्हाला लोकप्रिय पुस्तके पुस्तकांच्या दुकानांबरोबरच औषधांच्या दुकानातून,  सुपर मार्केटमधून, विमानतळावरून विकण्याचा अनुभव होता.

आर्थिक गणितांबरोबरच शक्‍य तितक्‍या अधिक वाचकांच्या हातात पुस्तक कसे जाईल, याविषयी मी त्यांना पत्रात लिहिले.  त्यांचे संशोधन सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी आमची निवड केली. 

त्यानंतर काही महिन्यांनी एका व्याख्यानासाठी हॉकिंग अमेरिकेला आले असता, मी त्यांना त्यांच्या हॉटेलवर भेटण्यासाठी गेलो. पार्किंगमध्ये येत असतानाच दुसरी एक  मोटार आली. त्यातून उतरलेल्या व्यक्तीने गाडीतून व्हीलचेअर काढली. त्याखाली बॅटरी बसवली. त्यानंतर त्याने पुढचे दार उघडले. एक सडपातळ व्यक्ती बाहेर पडून व्हीलचेअरवर बसण्याच्या प्रयत्नात असलेली दिसली. मला गाडीतून उतरताना पाहताच ‘‘इज दॅट पीट गुजार्दी? दिस इज प्रोफेसर हॉकिंग’’ असं ते अक्षरशः ओरडले. त्यानंतर आम्ही त्यांच्या रूमकडे चालू लागलो. आत गेल्यावर मी माझी ओळख करून देऊन इकडच्या तिकडच्या गप्पांनी सुरवात केली. त्यालाही त्यांनी थोडक्‍यात समर्पक उत्तरे दिली. ती त्यांच्या सहकारी ब्रायन याने मला सांगितली.

त्यानंतर तो म्हणाला, ‘‘प्रा. हॉकिंग विचारत आहेत तुम्ही करार आणला आहे का?’’ मी ती कागदपत्रे त्यांच्याकडे सुपूर्त केली. ब्रायन त्यांना पानामागून पान उलटून दाखवत होता आणि ते वाचत होते. अगदी श्‍वसनाच्या गतीने ते वाचत होते. त्यांचे शरीर नियंत्रणाबाहेर गेले होते, मात्र मन अधिक सक्रिय झाले होते. ब्रिटनमध्ये तोपर्यंत त्यांना प्रकाशक मिळाला नव्हता, त्यामुळे इंग्रजीतील पुस्तकाच्या संपादनाचे काम माझ्याकडे आले. शास्त्रीयदृष्ट्या अचूक, तरीही माझ्यासारख्या सामान्य वाचकाला समजेल, असे पुस्तक तयार करण्याच्या प्रयत्नात आम्ही होतो. यादरम्यान स्टीफन यांना जे सांगायचे आहे ते मला समजेपर्यंत मी त्यांना प्रश्‍न विचारत राहायचो. त्यात अनेक महिने गेले. मध्येच त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांचा आवाजही गेला. दुर्दम्य इच्छाशक्ती व कॉम्प्युटर सॉफ्टवेअरच्या मदतीने त्यांनी पुस्तकाचे काम पूर्ण केले आणि १९८७ मध्ये याचा शेवटचा ड्राफ्ट तयार झाला. या सर्वांधिक खपाच्या पुस्तकनिर्मितीत मला भूमिका निभावता आली, हा माझा सन्मान आहे, असं मी मानतो. 
- पीटर गुजार्दी, ‘ए ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम’ या पुस्तकाचे संपादक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: global news stephen hawking dies article peter guzzardi