
नाइस (फ्रान्स) : महासागरांच्या संरक्षणाबाबत केलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी सर्व देशांवर दबाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या तिसऱ्या महासागर परिषदेला आजपासून फ्रान्समधील नाइस शहरात सुरुवात झाली. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मुख्य भाषणात महासागरांच्या संरक्षणासाठी कृतीवर भर देण्याचे आवाहन सदस्य देशांना केले. जैवविविधता, हवामान, पर्यावरण आणि आरोग्य यासाठी आपण वर्षानुवर्षे करत असलेल्या संघर्षाच्या केंद्रस्थानी महासागरांचा लढा आहे, असेही त्यांनी सांगितले.