जागतिक गहू उत्पादनाची स्थिती यंदा चिंताजनक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Global wheat production situation Adverse weather India China USA suffer
जागतिक गहू उत्पादनाची स्थिती यंदा चिंताजनक

जागतिक गहू उत्पादनाची स्थिती यंदा चिंताजनक

लंडन : रशिया व युक्रेन युद्धामुळे जगभरात पुरवठा साखळी विस्कळित झालेली असताना या संकटात भर म्हणून जगातील महत्त्वाच्या गहू उत्पादक देशांना प्रतिकूल हवामानाचा फटका सहन करावा लागत आहे. एकूण चिंताजनक परिस्थितीमुळे जगातील यंदाच्या हंगामातील गहू उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम जाणवत आहे. त्याचा फटका जगभरातील गहू प्रक्रियादारांना जाणवणार आहेच. शिवाय गहू, ब्रेड, नूडल्स व पदार्थांच्या किंमतीतही वाढ होऊन जनतेला त्याची झळ बसू शकते.

जागतिक हवामान बदलाच्या अनुषंगाने दुष्काळ, महापूर, उष्णतेची लाट यांचा फटका विविध देशांतील गहू पिकाला बसला आहे. मागील चार हंगामांशी तुलना करता प्रथमच जगातील गहू उत्पादन कमी होण्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तवली आहे. गव्हावर आधारित ब्रेड, नूडल्स तसेच अन्य पदार्थांची मोठी जागतिक बाजारपेठ आहे. गव्हाच्या किंमती भडकल्या तर या पदार्थाच्या किंमतीही वाढून प्रक्रियादारांबरोबरच सर्वसामान्य जनता देखील या महागाईत होरपळून निघणार आहे. विशेषतः आफ्रिका व युरोपातील जनतेचे अर्थकारण मात्र या महागाईला तोंड देताना पूर्णपणे बिघडून जाणार आहे.

युरोपातील स्थिती

  • युरोपीय महासंघ हा जगातील सर्वात मोठा गहू पुरवठादार.

  • ५० टक्क्यांहून अधिक गहू उत्पादक टप्प्यात पिकाच्या वाढीच्या काळात पावसाची उणीव भासली.

  • पावसाचे आगमन न झाल्यास उत्पादनाचे अंदाज पुन्हा नव्याने मांडावे लागतील

अमेरिका, चीनमध्ये स्थिती बिकट

अमेरिकाही अवर्षणजन्य परिस्थितीला तोंड देत आहे. त्यामुळे तेथील गहू उत्पादकांना देखील यंदाचा हंगाम चांगला साधेल अशी स्थिती नाही. अमेरिकेतील सर्वात मोठा गहू उत्पादक पट्टा असलेल्या कॅन्सस भागात पुढील महिन्यात काढणी सुरू होणार आहे. मात्र गेल्या पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत तेथील उत्पादन यंदा बऱ्याच कमी पातळीवर राहिल असा अंदाज आहे. चीन हा जगातील आघाडीचा गहू उत्पादक देश आहे. मात्र अवेळी आलेल्या पूर मात्र हिवाळी हंगामावर परिणाम करून गेले आहेत. गव्हाचे त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

भारतात घट येण्याचा संभव

भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश आहे. १९०१ च्या कालावधीशी तुलना करता यंदा भारतात गहू वाढीच्या महत्वाच्या काळातील कालावधी हा सर्वात उष्ण असल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे गहू उत्पादनात १० ते ५० टक्के घट येण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. देशाच्या अन्न मंत्रालयाने यंदा १११ दशलक्ष टन गहू उत्पादनाचा अंदाज वर्तवला होता. मात्र परिस्थिती बिघडल्याने तो १०५ दशलक्ष टनांवर आला आहे.

Web Title: Global Wheat Production Situation Adverse Weather India China Usa Suffer

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top