भारतासाठी सुखदायक आणि चीनसाठी दुखदायक बातमी; काय ते वाचा

America-and-Chin
America-and-Chin
Updated on

वॉशिंग्टन - कोरोनासंदर्भात ‘खोटेपणा, दिशाभूल आणि लपवाछपवी’ करत जगभर संसर्ग पसरविल्याबद्दल चीन सरकारला जबाबदार ठरविण्यासाठी अमेरिकेमध्ये १८ मुद्यांची योजना तयार करण्यात आली आहे. चीनमधून कंपन्यांना माघारी बोलाविणे आणि भारताशी लष्करी संबंध दृढ करणे, या मुद्यांना या योजनेत प्राधान्य देण्यात आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अमेरिकचे वरीष्ठ सिनेटर थॉम टिलीस यांनी हा मसुदा तयार केला आहे. ‘चीन सरकारने दुष्टहेतून विषाणूबाबत लपवाछपवी केल्याने संसर्ग जगभरात पसरला आहे. यामुळे अनेक अमेरिकी नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे. याच चीन सरकारने त्यांच्या स्वत:च्या नागरिकांना छळछावणीत टाकले, अमेरिकेचे तंत्रज्ञान चोरले आणि अमेरिकेच्या मित्रदेशांचीही स्वायत्तता धोक्यात आणली,’ असे टिलीस यांनी मसुदा सादर करताना सांगितले. चीनच्या या कृत्यांमुळे जगाला इशाराच मिळाला असून त्यांना अद्दल घडविण्यासाठी हा मसुदा तयार करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. बीजिंगमध्ये २०२२ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा मागे घेण्याची विनंती ऑलिम्पिक समितीला करण्याची विनंतीही टिलीस यांनी अमेरिका सरकारला केली आहे. 

योजनेतील प्रमुख मुद्दे...

  • प्रशांत महासागरात संरक्षण यंत्रणा निर्माण करणे
  • अमेरिकी लष्कराला तातडीने २० अब्ज डॉलरचा निधी देणे
  • भारत, तैवान आणि व्हिएतनामबरोबर लष्करी संबंध अधिक दृढ करणे
  • लष्कर उभारणीसाठी जपानला प्रोत्साहन देणे
  • जपान आणि दक्षिण कोरियाला लष्करी साहित्य पुरविणे
  • चीनमधील अमेरिकी उत्पादन कंपन्यांना माघारी बोलाविणे
  • चीनवरील अवलंबित्व कमी करणे
  • अमेरिकी तंत्रज्ञान चोरी करण्यापासून चीनला रोखणे
  • सायबर सुरक्षा अधिक मजबूत करणे
  • चिनी कंपन्यांवर निर्बंध आणणे
  • चीन सरकारवर निर्बंध आणणे

चीनमधील गुंतवणूक काढून घेणार - ट्रम्प
अमेरिकन पेन्शन फंडच्या अब्जावधी डॉलरची चीनमध्ये केलेली गुंतवणूक काढून घेणार असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज स्पष्ट केले. चिनी कंपन्यांमध्ये केलेली इतरही गुंतवणूक काढून घेण्याचा निर्णय विचाराधीन असल्याचेही ते म्हणाले. अमेरिकेत असलेल्या चिनी कंपन्यांवर अधिक कडक निर्बंध घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com