उत्पन्नातील वाटा देण्यास गुगल ऑस्ट्रेलियाचा नकार; माध्यम समूहांच्या आकडेवारीला आक्षेप 

वृत्तसंस्था
Wednesday, 3 June 2020

मेल सिल्व्हा म्हणाले की, ऑस्ट्रेलियातील माध्यमांत तयार होणाऱ्या बातम्यांपासून गुगलला फार कमी उत्पन्न मिळते. तेथील ग्राहक आयोगासमोर बाजू मांडताना प्रकाशक चुकीची आकडेवारी सादर करत आहेत.

सिडनी-  ऑस्ट्रेलियन माध्यमांकडून तयार होणाऱ्या बातमी आणि माहितीच्या वापराबद्दल या कंपन्यांना गुगल आणि फेसबुक या दोन्ही सर्च इंजिन जायंट्सनी दरवर्षी सहाशे दशलक्ष डॉलर द्यावेत, हा सरकारी आदेश मान्य कऱण्यास गुगल ऑस्ट्रेलियाने स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. सरकारकडून देण्यात आलेली आकडेवारी अवास्तव स्वरूपाची असल्याचे या कंपनीकडून सांगण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यासंदर्भात बोलताना गुगल ऑस्ट्रेलियाचे व्यवस्थापकीय संचालक मेल सिल्व्हा म्हणाले की, " ऑस्ट्रेलियातील माध्यमांत तयार होणाऱ्या बातम्यांपासून गुगलला फार कमी उत्पन्न मिळते. तेथील ग्राहक आयोगासमोर बाजू मांडताना प्रकाशक चुकीची आकडेवारी सादर करत आहेत.” ट्रेजर जोश फ्रायडेनबर्ग यांनी या आयोगास देशातील माध्यम कंपन्या आणि गुगल आणि फेसबुक यांच्यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी वेगळी संहिता निश्‍चित करण्याचे निर्देश दिले होते. यामुळे बड्या कंपन्यांना जाहिरातींमधून मिळणारा महसूल ऑस्ट्रेलियातील माध्यम कंपन्यांशी शेअर करणे शक्य होईल. न्यूज कॉर्प, सेव्हन वेस्ट मिडिया आणि नाईन एंटरटेन्मेंट या कंपन्या ऑनलाइन महसुलासाठी आग्रही आहेत. 

दहा टक्के वाट्याची मागणी 
नाईन एंटरटेन्मेंट या कंपनीचे अध्यक्ष पीटर कॉस्टेलो यांनी मागील महिन्यात गुगल आणि फेसबुक यांनी ऑस्ट्रेलियातून कमावलेल्या उत्पन्नाच्या दहा टक्के एवढा वाटा आमच्या कंपन्यांना द्यावा अशी मागणी केली होती. यासाठी त्यांनी या दोन्ही कंपन्यांनी जाहिरातीच्या माध्यमातून २०१८ मध्ये कमावलेल्या ६ अब्ज डॉलर एवढ्या महसुलाचा हवाला दिला होता. सिल्व्हा यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला होता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सिल्व्हा यांचे म्हणणे 
गुगल सर्चचा वृत्त  प्रकाशकांनाच लाभ 
तीन अब्जपेक्षाही अधिक  मोफत व्हिजिट मिळाल्या 
आमच्यामुळेच माध्यमांना  २१८ दशलक्ष डॉलरचे उत्पन्न 
माहितीचा विचार करताना  अर्थशास्त्र सांभाळावे लागेल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google Australia has explicitly refused to accept the government order