'क्रोकोडाइल हंटर' इरविनचे आज गुगल डूडल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

'क्रोकोडाइल हंटर' म्हणून प्रसिद्ध असलेले पशूप्रेमी स्टीव्ह इरविन यांचा आज जन्मदिवस. यानिमित्त गुगलने त्यांचे डूडल केले आहे. 

'क्रोकोडाइल हंटर' म्हणून प्रसिद्ध असलेले पशूप्रेमी स्टीव्ह इरविन यांचा आज जन्मदिवस. यानिमित्त गुगलने त्यांचे डूडल केले आहे. 

या डूडलमध्ये वेगवेगळ्या स्लाइड्स तयार करून त्यातून इरविन यांचे पशू-पक्ष्यांबद्दलचे प्रेम अधोरेखित करण्यात आले आहे. पशूप्रेमी असलेले इरविन हे वन्यजीव संरक्षक, ऑस्ट्रेलियात झू-कीपर म्हणूनही कार्यरत होते. इरविन यांनी पत्नी टेरी यांच्यासोबत अनेक वाहिन्यांवर मगरींच्या जीवनाशी संबंधित 'क्रोको फाइल्स', 'द क्रोकोडाइल हंटर डायरीज' आणि 'न्यू ब्रीड वेट्स' आदी वाइल्डलाइफ डॉक्युमेंट्री सादर केल्या आहेत. इरविन यांनी अनेक वन्यजीव, पशूंच्या नव्या प्रजातींचाही शोध लावला आहे. 

समुद्री जीवांवर आधारित एका अंडरवॉटर शूटिंगच्या वेळी स्टिंग-रे माशाने दंश केल्याने इरविन यांचा २००६ मध्ये मृत्यू झाला.

मगरींविषयी त्यांना विशेष प्रेम होते. त्यामुळे त्यांना 'क्रोकोडाइल हंटर' हे टोपण नाव मिळाले. पशू-पक्ष्यांशी मैत्री करणाऱ्या इरविन यांच्या सन्मानार्थ १५ नोव्हेंबर हा दिवस 'स्टीव्ह इरविन डे' म्हणून साजरा केला जातो. डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफिक आणि अॅनिमल प्लॅनेट आदी टीव्ही वाहिन्यांवर इरविन यांचे शो असायचे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google Doodle celebrates 57th birth anniversary of Steve Irwin