Russia-Ukraine War: गुगल ट्रान्सलेटने सहा भारतीयांना रशियन युद्धातून बाहेर पडण्यास कशी केली मदत? नेमकं काय घडलं?

Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. रशिया सातत्याने युक्रेनवर हल्ले करत आहे.
Russia-Ukraine War
Russia-Ukraine WarDainik Gomantak

Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. रशिया सातत्याने युक्रेनवर हल्ले करत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी काही भारतीय तरुणांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते आपली फसवणूक झाल्याचे सांगताना दिसले होते. चांगल्या पगाराची नोकरी देण्याच्या बहाण्याने एजंटनी रशियात घेऊन गेल्याचे त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले होते.

दरम्यान, रशियन सैन्याकडून आपल्याला जबरदस्तीने युक्रेनविरुद्ध युद्ध लढण्यासाठी ढकलण्यात येत असल्याचेही ते म्हणाले होते. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. युक्रेनविरुद्धच्या युद्धात एजंटद्वारे रशियात (Russia) फसलेल्या चारपैकी दोन तरुण भारतात परतले आहेत. हे तरुण केरळचे असल्याचे सांगितले जात आहे. हे तरुण युद्धक्षेत्रातून जखमी अवस्थेत घरी परतले आहे.

दुसरीकडे, केरळमधील (Kerala) आणखी सहा तरुणांची अशीच कहाणी आहे, ज्यांची अशा दुर्दशेतून सुटका झाली. विशेष म्हणजे, या सुटेकसाठी त्यांनी गुगल ट्रान्सलेटरची मदत घेतली. द हिंदूशी बोलताना, कोल्लममधील थेक्कुंभगमचे असलेले जेसन जॉर्ज (नाव बदलले आहे), यांनी सर्व हकिकत सांगितली. त्यांनी सांगितले की, ते आणि इतर पाचजण 19 फेब्रुवारी रोजी रशियाला पोहोचले होते.

Russia-Ukraine War
Russia Ukraine War: युद्ध रशिया-युक्रेनचे, जीव जातोय नेपाळी तरुणांचा; आणखी 16 जणांना गमवावे लागले प्राण

दरम्यान जेसन जॉर्ज यांनी सांगितले की, ''त्यांना तिरुअनंतपुरममधील एजंटने सिक्युरिटी गार्डची नोकरी देण्याची ऑफर दिली होती, ज्याने यापूर्वी तिरुअनंतपुरममधील चार तरुणांना रशियाला पाठवले होते. आम्ही मॉस्कोला पोहोचल्यानंतर लगेचच, एक व्यक्ती आम्हाला रशियाच्या ईशान्येकडील लष्करी तळावर घेऊन गेला. तिकडे जातानाच्या प्रवासादरम्यान आम्हाला सांगण्यात आले की, तुम्हाला तिथे तीन आठवड्यांचे लष्करी प्रशिक्षण दिले जाईल. त्याने आमच्या प्रत्येकाकडून $1,350 ते $1,500 घेतले."

जॉर्जने पुढे सांगितले की, ''दुसऱ्या दिवशी आम्हाला लष्करी सेवेत रुजू होण्यापूर्वी एक वर्षाचा करार करण्यास सांगण्यात आले. करार पत्र रशियन भाषेत लिहिलेले होते. मात्र आम्हाला ते करारपत्र वाचू न देता त्यावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले गेले.''

Russia-Ukraine War
Russia-Ukraine War: 'रशियामध्ये फिरायला गेले 7 जण, अन् गंडवून युक्रेनशी लढायला पाठवलं..', पंजाब-हरियाणातील नागरिकांनी सांगितली आपबीती

जॉर्जने पुढे सांगितले की, ''करारपत्र हे रशियन भाषेत असल्याने आम्हाला ते वाचता येत नव्हते. परंतु आम्ही करारपत्र वाचण्यासाठी गुगल ट्रान्सलेटरचा सहारा घेतला. गुगल ट्रान्सलेटच्या साहाय्याने संपूर्ण करारपत्र वाचले. त्यावरुन आम्ही मोठ्या सापळ्यात अडकलो आहोत याची जाणीव झाली. या करारपत्रामध्ये युक्रेनच्या सैन्याविरुद्ध लढण्यासाठी आम्हाला सैनिक म्हणून भरती करण्यात आल्याचा स्पष्ट उल्लेख होता. आम्ही टर्म यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर, आम्हाला इतर गोष्टींबरोबरच रशियामध्ये कायमस्वरुपी निवासी दर्जा आणि रशियन पासपोर्ट ऑफर केला जाईल. असा उल्लेख करारपत्रात होता. मात्र कोणताही विचार न करता, हे करारपत्र फाडले आणि भारतात परतण्याची परवानगी मागितली,”

दुसरीकडे, सर्व पीडित गरीब कुटुंबातील असून त्यांनी सावकाराकडून कर्ज घेतले होते. जॉर्ज रशियातून आल्यापासून मुंबईतच आहे. जॉर्जने सांगितले की, मी रिकाम्या हाताने घरी जाऊ शकत नाही, कारण माझे वडील एक ऑटो ड्रायव्हर आहेत. त्यांनी सावकाराकडून कर्ज घेतले होते. येथे मी नोकरी शोधण्याच्या प्रयत्नात होतो. परंतु मला ती मिळाली नाही तर माझे संपूर्ण कुटुंबाला आत्महत्या करावी लागेल.”

Russia-Ukraine War
Russia-Ukraine War: रशियात क्षेपणास्त्र हल्ल्यात भारतीयाचा मृत्यू, कुटुंबीय मृतदेहाशिवाय करणार अंत्यसंस्कार; मोदी सरकारकडे केली 'ही' मागणी

दरम्यान, ऑल मॉस्को मलयाली असोसिएशनचे अध्यक्ष बिनू पण्णीकर यांनी त्यांना या संकटाच्या समयी मदत केली. पीडितांनी रशियन भाषेत असलेली कराराची प्रत पाठवल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य पण्णीकर यांच्या लक्षात आले.

पण्णीकर यांनी भारतीय दूतावासाच्या मदतीने तिरुअनंतपुरम येथील प्रिन्स सेबॅस्टियन आणि डेव्हिड मुथप्पन या दोन जखमी तरुणांना परत आणण्यास मदत केली. अद्याप युद्धपातळीवर असलेल्या इतर दोघांनाही आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असे पण्णीकर यांनी सांगितले. तर दुसरीकडे, परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून रशियन परराष्ट्र विभागाच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com