गुगलची आता चीनमध्येही होणार 'एन्ट्री'

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : काही देशांमध्ये इंटरनेट सेवा वापरावर विशेष बंधने नाहीत. मात्र, चीनमध्ये इंटरनेट वापरावर बहुतांश प्रमाणात सरकारचा हस्तक्षेप असल्याची अनेक उदाहरणे आहेत. असे असताना आता काही वर्षांनंतर सर्वात प्रसिद्ध सर्च इंजिन असलेल्या गुगलने चीनमध्येही 'एन्ट्री' केली आहे.

गुगलचा वापर जगातील बहुतांश देशात केला जातो. मात्र, यापूर्वी चीनमध्ये गुगल वापरावर पूर्णपणे निर्बंध होते. त्यानंतर आता हे निर्बंध उठविण्यात आले असून, चीनमध्येही गुगलचा वापर करता येणार आहे. मात्र, गुगलचा वापर सरकारच्या नियंत्रणात असणार आहे. चीनी सरकारचे यामध्ये नियंत्रण असल्याने विवादात्मक मजकूर किंवा शब्दांवर बंदी घालण्यात आली आहे. चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई यांची 2017 मध्ये घेतली होती. या बैठकीनंतर आज गुगल वापराची परवानगी देण्यात आली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: google will Enter in china soon