रोम - लॉकडाउनमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय इटलीने घेतला असून, ३ जून पासून प्रवासावरील निर्बंध हटविण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवासालाही सरकारने परवानगी दिल्यामुळे इटलीला जाणाऱ्या आणि त्या देशातून इतर ठिकाणी जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी इटलीमध्ये मार्चच्या सुरवातीपासून लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. कोरोनाच्या विषाणूचा सर्वाधिक उद्रेक झालेल्या देशांमध्ये इटलीचा समावेश होतो. कोरोनाच्या विषाणूमुळे इटलीत ३१ हजारहून अधिक लोकांचे बळी गेले आहेत. वास्तव्याला असलेल्या प्रांतामध्ये प्रवास करण्यास नागरिकांना सोमवारपासून (ता. १८) मुभा दिली जाणार आहे. इटलीमध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रवासासह नागरिकांच्या हालचलींवर निर्बंध आणण्यात आले होते.
दृष्टिक्षेपात
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.