भविष्यात भारताला मोठ्या संधी

पीटीआय
शुक्रवार, 22 मे 2020

जगातील अनेक देश आपली पुरवठा साखळी सक्षम करण्याचा प्रयत्न करणार असल्याने कोरोनानंतरच्या काळात भारताला मोठी संधी उपलब्ध होणार आहे, असा अंदाज अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे. ही संधी साधण्यासाठी स्वतःला चाकोरीबद्ध ठेवलेल्या भारताला आपली कवाडे थोडी उघडावी लागतील, असे त्यांनी सांगितले.

वॉशिंग्टन - जगातील अनेक देश आपली पुरवठा साखळी सक्षम करण्याचा प्रयत्न करणार असल्याने कोरोनानंतरच्या काळात भारताला मोठी संधी उपलब्ध होणार आहे, असा अंदाज अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे. ही संधी साधण्यासाठी स्वतःला चाकोरीबद्ध ठेवलेल्या भारताला आपली कवाडे थोडी उघडावी लागतील, असे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

अमेरिकेच्या गृह खात्यातील मध्य आणि दक्षिण आशियाच्या प्रमुख अॅलीस जी. वेल्स यांनी आज कॉन्फरन्स कॉलद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारताला जागतिक बाजारपेठेत असलेल्या संधींबाबत चर्चा केली.

कोरोनानंतरच्या काळात जागतिकीकरणाचा वेग मंदावेल आणि देशांतर्गत उत्पादनावर भर दिला जाईल. त्याचवेळी पुरवठा साखळी अधिक विस्तारण्यावरही देशांचा भर असेल. येथेच भारताला मोठी संधी असून त्यांनी नवी धोरणे तयार करत विदेशी कंपन्यांचे स्वागत करायला हवे, असे वेल्स म्हणाल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Great opportunities for India in the future