Video: बेडकाने खाल्लं चक्क जिवंत सापाला...

वृत्तसंस्था
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

साप बेडकावर हल्ला करून खात असल्याचे सर्वांनाच माहित आहे. परंतु, एका बेडकाने चक्क जिवंत सापाला 37 सेकंदामध्ये गिळंकृत केले आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे शिकारी खुद शिकार हो गयाचा अनुभव आला आहे.

सिडनी (ऑस्ट्रेलिया): साप बेडकावर हल्ला करून खात असल्याचे सर्वांनाच माहित आहे. परंतु, एका बेडकाने चक्क जिवंत सापाला 37 सेकंदामध्ये गिळंकृत केले आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे शिकारी खुद शिकार हो गयाचा अनुभव आला आहे.

हिरव्या रंगाच्या बेडकाने सापावर हल्ला करून अवघ्या 37 सेकंदात गिळंकृत केले. बेडकाच्या तावडीतून सुटण्यासाठी सापाने धडपड सुरू ठेवली होती. मात्र, बेडकाने त्याला जीवन मरणाच्या लढाईत पराभूत केले. संबंधित व्हिडिओ क्वीन्सलँडमध्ये राहणाऱ्या एका महिलेने कैद केला आणि छायाचित्रासह सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. जगातील सर्वाधिक विषारी असणारा तिसऱ्या क्रमांकाचा साप या हिरव्या रंगाच्या बेडकाने गिळल्यामुळे अनेकजण व्यक्त होताना दिसत आहेत.

Video: श्वानाने दिली भजन गायनाला साथ...

दरम्यान, 2018 रोजी एक व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. या व्हिडिओमध्येही हिरव्या रंगाचा बेडून कसा साप खाताना दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: green frog eats the poisonous snake in australia