esakal | ग्रेटा थनबर्गला भारतीय विद्यार्थ्यांची काळजी; जेईई- नीट परीक्षेबद्दल व्यक्त केलं मत
sakal

बोलून बातमी शोधा

greta thunberg.jpg

कोरोनाच्या संकटकाळात संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) आणि राष्‍ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) पुढे ढकल्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे

ग्रेटा थनबर्गला भारतीय विद्यार्थ्यांची काळजी; जेईई- नीट परीक्षेबद्दल व्यक्त केलं मत

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- कोरोनाच्या संकटकाळात संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) आणि राष्‍ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) पुढे ढकल्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. विद्यार्थ्यांसह अनेक राजकीय नेत्यांनीही या परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे. स्वीडनची प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनेही याबाबत ट्विट करून विद्यार्थ्यांचे समर्थन केले आहे. ग्रेटाने मंगळवारी केलेल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारतात कोरोनाच्या साथ असताना आणि पुराचा मोठा फटका बसलेला असताना तेथील विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा देण्यास सांगणे हे अन्‍यायकारक आहे. त्यांच्या #PostponeJEE_NEETinCOVID या चळवळीला माझा पाठिंबा आहे. 

भारताने उतरवला पाकचा मुखवटा; पुन्हा पाडलं तोंडघशी

स्वीडनची पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg) जलवायू परिवर्तन विरोधात एक वर्ष काम केल्यानंतर पुन्हा शाळेत रुजू झाली आहे. शाळेतून परतल्यानंतर ती म्हणाली की, माझा एक वर्षाचा शाळेचा गॅप पूर्ण झाला आहे. त्यामुळे मी पुन्हा शाळेत आले आहे. शाळेत येऊन मला खूप आनंद वाटला. ग्रेटाने शाळेची बॅग आणि साईकलचा फोटो शेअर केला आहे. 16  वर्षाच्या ग्रेटाने जगातील नेत्यांना आपल्या पर्यावरणाच्या प्रश्वांबाबत हैराण करुन सोडले होते. 

ग्रेटा थनबर्गने यूएनमध्ये अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. आमचं बालपण, आमची स्वप्न तुम्ही हिसकावून घेतली आहेत. तुमची हिंमत कशी झाली? असा सवाल तिने यूएनच्या महासचिवांसमोर अनेक नेत्यांना विचारला होता. 16 वर्षीय ग्रेटा जेव्हा संयुक्त राष्ट्रात उच्चस्तरीय क्लाईमेट अॅक्शनच्या बैठकीदरम्यान बोलायला सुरुवात केली, तेव्हा अनेक नेते तिच्या प्रश्नांनी अनुत्तरीत झाले होते. तुम्ही आज जी पर्यावरणाची हानी करत आहात, यासाठी तुम्हाला युवा पीढी कशीच माफ करणार नाही. तुमच्या हव्यासापोटी सर्व इको सिस्टिम नष्ट होईल, असं ग्रेटा म्हणाली होती. 

कोरोना संसर्गाची दुसऱ्यांदा बाधा शक्य; पुरावा मिळाल्याचा शास्त्रज्ञांचा दावा 

दरम्यान, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी आज केंद्राला पत्र लिहून दोन्ही प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. ‘‘सध्याच्या कोरोनाच्या काळात ही परीक्षा देण्यासाठी केंद्रावर प्रत्यक्ष जाणे हे राज्यातील ५० हजार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टिने अत्यंत घातक ठरेल,’’ असे पटनाईक यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तमिळनाडूतील नेते एम.के. स्टॅलिन यांनी अशी मागणी यापूर्वीच केली आहे.


 

loading image
go to top