
हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे गाझापट्ट्यात तीव्र अन्नटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. जीवनावश्यक वस्तू सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. गाझा पट्ट्यातील नागरिकांना मदत करण्यासाठी पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग जहाजातून निघाली होती. पण तिचं जहाज इस्रायली सुरक्षा दलांनी अर्ध्या वाटेतच अडवलं आहे. ग्रेटाला आता इस्रायलला नेण्यात येत आहे. ग्रेटा थनबर्गसह जहाजावर ११ जण आहेत. मॅडलीन नावाच्या जहाजावरून गाझातील लोकांसाठी मदत केली जात आहे.