ग्वाटेमालात ज्वालामुखीचे 25 बळी 

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 जून 2018

सक्रिय ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने किमान 25 जणांचा रविवारी मृत्यू झाला. उद्रेकामुळे ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे विमानतळावरील हवाई वाहतूक रोखण्यात आली आहे. ज्वालामुखीच्या स्थितीबाबत आपत्कालीन संस्थेच्या राष्ट्रीय समन्वयच्या प्रवक्‍त्याने यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी मृतांची संख्या 25 असल्याचे म्हटले आहे. 
 

ग्वाटेमाला : सक्रिय ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने किमान 25 जणांचा रविवारी मृत्यू झाला. उद्रेकामुळे ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे विमानतळावरील हवाई वाहतूक रोखण्यात आली आहे. ज्वालामुखीच्या स्थितीबाबत आपत्कालीन संस्थेच्या राष्ट्रीय समन्वयच्या प्रवक्‍त्याने यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी मृतांची संख्या 25 असल्याचे म्हटले आहे. 

बेपत्ता आणि मृतदेहांचा शोध घेण्यासाठी सुरू केलेली मोहीम कमी प्रकाश आणि धोकादायक स्थितीमुळे थांबवण्यात आली आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे परिसरातील आकाशात राख पसरली आहे. ग्वाटेमालाचे अध्यक्ष जिम्मी मोराल्स यांनी एस्क्‍युन्टिला, चिमाल्टेनांगो आणि सॅकेटेपेक्वेज भागात अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. देशात आपत्कालीन स्थिती जाहीर करण्याबाबत कॉंग्रेसशी चर्चा करू, असे मोराल्स यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guatemala's Fuego volcano erupts, killing at least 25

टॅग्स