
पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांची संघटना असलेल्या ओपेकच्या नेत्यांमध्ये एक वर्चुअल बैठक होणार आहे
न्यूयॉर्क: पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांची संघटना असलेल्या ओपेकच्या नेत्यांमध्ये आज एक वर्चुअल बैठक होणार आहे. यामध्ये कच्च्या तेलाच्या मागणीत घट झाल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाउन लावलं जात आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार ओपेक ( Organization of the Petroleum Exporting Countries) सदस्य देश या बैठकीत त्यांचे उत्पादन कोणत्या पातळीवर ठेवण्याची गरज आहे याचा विचार करणार आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत चढउतार होत असताना ओपेकचे सदस्य देश पुढील वर्षापर्यंत उत्पादन कपात वाढवण्याचा विचार करू शकतात असे मानले जात आहे. सौदीच्या नेतृत्वाखालील ओपेक देशांची आज बैठक होत आहे.
1 डिसेंबरपासून देशात होणार 5 महत्वपूर्ण बदल; ज्याचा परिणाम थेट सामान्यांवर
या बैठकीत सदस्य देश उत्पादनावर सहमत होण्याची शक्यता होईल. ओपेक प्लस या गटातील अतिरिक्त सदस्यांचीही मंगळवारी बैठक होणार आहे. सध्या ओपेक प्लसचे नेतृत्व रशियाकडे आहे. जगात संसर्गाचे रुग्ण पुन्हा वाढत असल्याने कच्च्या तेलाच्या गरजेबाबत संभ्रम आहे.
कोरोनामुळे सध्या जागतिक पातळीवर इंधनाच्या मागणीत कमालीची घट झाली. यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीतही घट झाली आहे, ज्यामुळे आखाती देशांच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. एका अहवालानुसार, तेलाच्या किंमती कमी झाल्यामुळे सौदी अरेबियाला सुमारे 27 अब्ज डॉलर म्हणजेच 100 अब्ज रियाल किंवा 2 लाख कोटी रुपयांचा तोटा होणार आहे.
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणतात, भारतीय अर्थव्यवस्था येतेय रुळावर
आंतरराष्ट्रीय कमॉडिटी मार्केटवर परिणाम-
कोरोनामुळे जगभरातील बाजार पडला असताना बरेच गुंतवणुकदार सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी पर्याय शोधत होते. यामुळे बऱ्याच जणांनी सोने, चांदीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे सोने-चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते. कोरोनाकाळात ऑगस्ट महिन्यात या किंमती ऐतिहासिक वाढल्या होत्या. सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमला 56 हजारांच्या वर गेल्या होत्या तर चांदी प्रतिकिलोला 79 हजारांच्या जवळ गेली होती.
(edited by- pramod sarawale)