const e=e=>{const o=window.location.origin;navigator.sendBeacon(`${o}/scooby/api/v1/log/event`,JSON.stringify(e))};e({page_url:window.location.href,referrer:document.referrer,event_type:"page_view"}),(()=>{const o=window.history.pushState;window.history.pushState=new Proxy(o,{apply:(o,r,n)=>{const t=window.location.href,i=o.apply(r,n),a=window.location.href;return t!==a&&e({page_url:a,referrer:document.referrer,event_type:"page_view"}),i}})})();

Firing in Mosque: मशिदीत नमाज अदा करत असताना बंदूकधारी व्यक्तीने केला गोळीबार; 6 जणांचा मृत्यू

Firing in Mosque: शिया मशिदीत नमाज अदा करत असलेल्या लोकांवर अज्ञात बंदूकधाऱ्याने गोळीबार केला, या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला.
Firing in Mosque
Firing in MosqueEsakal

Firing in Mosque: पश्चिम अफगाणिस्तानातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अफगाणिस्तानामध्ये एका बंदूकधाऱ्याने मशिदीत घुसून नमाज अदा करत असणाऱ्यांवर गोळीबार केला, या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तालिबानच्या एका अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली.

तालिबानच्या अंतर्गत मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल मतीन कानी यांनी दिलेल्या माहितीनुसार हेरात प्रांतातील गुजारा जिल्ह्यातील मशिदीवर सोमवारी रात्री हल्ला झाला. त्यांनी एक्स वर पोस्ट केले की घटनेची चौकशी केली जात आहे.

Firing in Mosque
Labour Day : एक दंगल झाली आणि त्यामुळे जगात कामगार दिन साजरा होऊ लागला, वाचा इतिहास

या हल्ल्यात मशिदीचा इमामही मारला गेला

मशिदीतील गोळीबाराची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, या हल्ल्यात मशिदीचा इमामही ठार झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर बंदूकधारी तेथून पळून गेला.

Firing in Mosque
Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष हमीद करझाई यांनी X वर पोस्ट केले, “मी इमाम जमान मशिदीवरील हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. मी हे दहशतवादी कृत्य सर्व धार्मिक आणि मानवतावादी मानदंडांच्या विरुद्ध असल्याचे मानतो.”

अफगाणिस्तानात आयएस तालिबानला देतय आव्हान

इस्लामिक स्टेट अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा प्रमुख प्रतिस्पर्धी आहे. ही दहशतवादी संघटना अनेकदा अफगाणिस्तानातील शाळा, रुग्णालये, मशिदी आणि शिया क्षेत्रांना लक्ष्य करते.

Firing in Mosque
UK Video: हातात तलवार घेऊन तो लंडनच्या रस्त्यावर फिरत होता, 2 पोलिसांसह अनेकांना भोसकले, पाहा व्हिडिओ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com