Hafiz Saeed : 'दहशतवादी हाफिज सईदला आमच्या ताब्यात द्या', भारताने पाकिस्तानकडे केली मागणी

लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक आणि मुंबईतील दहशतवादी संघटनेचा मास्टरमाईंड हाफिज सईदला भारतात आणण्यासाठी भारत सरकारने मोठं पाऊल उचललं आहे.
Hafiz Saeed
Hafiz Saeedesakal

नवी दिल्लीः लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक आणि मुंबईतील दहशतवादी संघटनेचा मास्टरमाईंड हाफिज सईदला भारतात आणण्यासाठी भारत सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. भारताने पाकिस्तानकडे हाफिजच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे.

भारताने पाकिस्तानला अधिकृतरित्या म्हटलं की, हाफिज सईदला आमच्या हवाली करा. हाफिज भारतासाठी महत्वाचा असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. मात्र पाकिस्तानकडून अद्याप कुठलंही उत्तर आलेलं नाही.

Hafiz Saeed
Jagdish Aphale: १९९२ मध्ये आंदोलनकर्ते ते आज राम मंदिराचे प्रोजेक्ट मॅनेजर...कोण आहेत पुण्याचे जगदीश आफळे?

सरकारी सूत्रांनी 'न्यूज १८ हिंदी'ला दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारने अधिकृतरित्या पाकिस्तानकडे २६/११ हल्ल्यातील मास्टरमाईंड हाफिज सईदला 'एनआयए'ने दाखल केलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी प्रत्यार्पण करण्याची मागणी केली. एवढंच नाही तर काश्मीरमधील दहशतवादी हल्ले आणि दहशतवादी गटांना फंडिंग प्रकरणात हाफिजवर आरोप आहेत.

विशेष म्हणजे, दहशतवादी हाफिज सईदच्या नवीन राजकीय आघाडीने 8 फेब्रुवारीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पाकिस्तानातील बहुतेक राष्ट्रीय आणि प्रांतीय विधानसभा मतदारसंघांसाठी आपले उमेदवार उभे केले आहेत. लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक दहशतवादी हाफिज सईद दहशतवादासाठी अर्थपुरवठा करतो, त्या प्रकरणांमध्ये दोषी ठरल्यानंतर तो 2019 पासून तुरुंगात आहे.

Hafiz Saeed
ठाण्यात ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळी बॉम्ब ठेवल्याचा ईमेल; बॉम्बशोधक पथक घटनास्थळी

भारताने पाकिस्तानकडे हाफिजचा ताबा मागितला आहे, मात्र पाकिस्तानने त्यावर काहीही उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे या प्रकरणात पाकिस्तानची भूमिका काय असेल? याकडे अनेक देशांचं लक्ष लागून राहिलं आहे. मोदी सरकारचं पुढचं पाऊल काय असेल? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com