हाफिजबाबत पाकने बहाणेबाजी करू नये

पीटीआय
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

हाफिजवर कारवाई करताना पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करावे. त्याच्यावर कारवाई टाळण्यासाठी कोणत्याही प्रकारची बहाणेबाजी करू नये

नवी दिल्ली - "मुंबईत 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार "जमात-ए-दुआ'चा म्होरक्‍या हाफीज सईद हाच असून, पाकिस्तानने कोणतीही बहाणेबाजी न करता त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे,'' अशी स्पष्ट मागणी भारताने केली आहे.

हाफिजविरोधात कोणताही गुन्हा नसल्याचे मत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी व्यक्त केले आहे. त्याला आक्षेप घेताना हाफिज हा दहशतवादी असून, त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया अमेरिकेने व्यक्त केली आहे.

याबाबत बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले, ""हाफिजवर कारवाई करताना पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करावे. त्याच्यावर कारवाई टाळण्यासाठी कोणत्याही प्रकारची बहाणेबाजी करू नये.''

Web Title: Hafiz Saeed pakistan