लाँग कोविड! अर्ध्याहून अधिक लोकांमध्ये कोरानोची लक्षणं कायम : लॅन्सेट जर्नल | Corona | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patients

लाँग कोविड! अर्ध्याहून अधिक लोकांमध्ये कोरानोची लक्षणं कायम : लॅन्सेट जर्नल

कोरोना विषाणूची लागणा झाल्यानंतर रूग्णालयात भरती करण्यात आलेल्या अर्ध्याहून अधिक रूग्णांमध्ये अद्यापही एक लक्षण कायम असल्याचे समोर आले आहे. कोरोनाबाबत करण्यात आलेल्या अभ्यासातून ही बाब समोर आल्याचे मेडिकल जर्नल लॅन्सेटचे म्हणणे आहे. याआधी, अमेरिकेत केलेल्या अभ्यासानुसार, कोविड-19 ची लागण झालेल्या 30 टक्के लोकं "लाँग कोविड" मुळे त्रस्त असल्याचेदेखील समोर आले होते.

हेही वाचा: गुडन्यूज! मान्सून अंदमान बेटावर होणार दाखल; तिसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात

लॅन्सेट रेस्पिरेटरी मेडिसिनने एका अभ्यासात म्हटले आहे की, अभ्यासातून समोर आलेल्या पुराव्यांवरून कोरोना संसर्गातून बरे झालेल्या अनेकांच्या अनेक अवयव आणि प्रणालींवर दीर्घकालीन परिणाम होत असल्याचे आढळून आले आहे. याशिवाय कोरोनापासून वाचलेल्या रूग्णांमध्ये आरोग्याची गुणवत्ता कमी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे लाँग कोविडचा धोका कमी करण्यासाठी लाँग कोविडचा प्रभाव आणि परिणामकारकता याबद्दल माहिती गोळा करण्याची नितांत गरज असल्याचे मत या अभ्यासात व्यक्त करण्यात आले आहे.

हेही वाचा: केरळमध्ये 'टोमॅटो फ्लू' चे थैमान, 80 हून अधिक मुले पीडित; जाणून घ्या लक्षणे

अभ्यासात नेमकं काय ?

लॅन्सेटने प्रकाशित केलेल्या अभ्यासात कोरोनाच्या गंभीर संसर्गानंतर शरिरात लाँग कोविडची लक्षणे किमान दोन वर्षे टिकून राहू शकतात. त्यामुळे अशा लक्षणांचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. यामुळे कोविडपासून बचावलेले रुग्ण पूर्णपणे कधी बरे होतील हे समजण्यास मदत होईल. कोविडमधून बरे झालेल्या लोकांची मोठी संख्या पाहता, गंभीर कोविडमधून बरे होण्याचे परिणाम हे प्रमुख आरोग्य चिंतेपैकी एक आहेत आणि त्याचे मोठे वैद्यकीय आणि सामाजिक-आर्थिक परिणाम होऊ शकतात असे मतही लॅन्सेटने व्यक्त केले आहे.

लाँग कोविडचे सर्वात सामान्य लक्षणं म्हणजे थकवा, स्नायू दुखणे, कमी झोप, शारीरिक मंदपणा आणि दम लागणे ही असून, बॉडी मास इंडेक्स असलेले रूग्ण ज्यांना कोरोनाकाळात रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच ज्यांना मधुमेह आहे अशा व्यक्तींना लाँग कोविडचा त्रास जाणवत असल्याचे अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांना आढळून आले आहे.

Web Title: Half Of Covid Survivors Show 1 Symptom Even 2 Years After Lancet Journal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top