केरळमध्ये 'टोमॅटो फ्लू' चे थैमान, 80 हून अधिक मुले पीडित; जाणून घ्या लक्षणे | Tomato Flu | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hospital

केरळमध्ये 'टोमॅटो फ्लू' चे थैमान, 80 हून अधिक मुले पीडित; जाणून घ्या लक्षणे

तिरुवनंतपुरम : कोरोनाचा कहर कमी होत असताना केरळमधून एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली असून, केरळमध्ये 'टोमॅटो फ्लू' (Tomato Flu) या आजाराने थैमान घातले आहे. राजातील अनेक भागात या आजाराची प्रकरणे समोर आली आहेत. आतापर्यंत या विषाणूजन्य आजाराने मोठ्या संख्येने लहान मुलांना (Tomato Flu In Kids) ग्रासले असल्याचे समोर आले आहे. बाधित होणाऱ्यांमध्ये पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचा समावेश असल्याचे समोर आले असून, केरळमध्ये 80 हून अधिक मुले पीडित झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (Tomato Flu In Kerala)

हेही वाचा: राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी; राज्य पेटवण्याचा मनसेचा इशारा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत 80 हून अधिक मुले या विषाणूजन्य आजाराला बळी पडली आहेत. त्यानंतर केरळच्या जिल्ह्यांपैकी टोमॅटो फ्लू रोखण्यासाठी, वैद्यकीय पथक (Medical Team) तामिळनाडू-केरळ सीमेवर दाखल झाली आहे. येथील मुलांमधील ताप, पुरळ आणि इतर समस्या असणाऱ्यांची तपासणी केली जात आहे. याशिवाय आणखी 24 सदस्यीय पथक तयार करण्यात आले असून, ते अंगणवाड्यांमधील पाच वर्षांखालील मुलांची तपासणी करणार आहे.

टोमॅटो फ्लू म्हणजे काय?

टोमॅटो फ्लू हा एक अज्ञात ताप आहे, जो मुख्यतः केरळमधील पाच वर्षांखालील मुलांमध्ये आढळून आला आहे. या फ्लूच्या विळख्यात आल्यानंतर मुलांच्या अंगावर पुरळ आणि फोड येतात. या खुणा सामान्यतः लाल रंगाच्या असतात, त्यामुळे त्याला टोमॅटो फ्लू असे संबोधले जात आहे. दरम्यान, हा आजार व्हायरल ताप, चिकुनगुनिया किंवा डेंग्यूचा पोस्ट-इफेक्ट आहे की नाही यावर सध्या अभ्यास केला जात आहे. केरळच्या छोट्या भागांमध्ये या आजाराची प्रकरणे आढळून आली आहे. तसेच यावर वेळीच उपाययोजना करण्यात आल्या नाही तर, हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरू शकतो अशी भीती आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. (What Is Tomato Flu)

हेही वाचा: चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग मेंदूच्या गंभीर आजाराने ग्रस्त

टोमॅटो फ्लूची लक्षणे काय ?

या आजाराची मुख्य लक्षणे म्हणजे पुरळ, फोड, ज्याचा रंग लाल असतो. याव्यतिरिक्त, रुग्णाला त्वचेच्या समस्या आणि डिहायज्रेशनदेखील होऊ शकते. याशिवाय, संसर्ग झालेल्या मुलांना खूप ताप, अंगदुखी, सांधे सुजणे, थकवा, ओटीपोटात दुखणे, उलट्या, जुलाब, हात, गुडघ्यांचा रंग बदलणे, खोकला, शिंका येणे आणि नाक वाहणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. (Symptoms Of Tomato Flu )

Web Title: More Than 80 Children Affected Due To Tomato Flu In Kerala

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Keralahealth news
go to top