Israel Hamas War : हमासकडून दोन इस्रायली महिलांची सुटका; अमेरिकेचा इस्त्राइलला महत्वाचा सल्ला

इस्त्राइल आणि हमास यांच्यात मागील काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे.
Hamas frees two Israeli women hostages us advises Israel Hamas War Update
Hamas frees two Israeli women hostages us advises Israel Hamas War Update

इस्त्राइल आणि हमास यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे. यादम्यान पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने गाझामध्ये इस्राइलच्या दोन ओलिसांची सुटका केली आहे. या दोघीही वृद्ध इस्रायली महिला आहेत. इजिप्त आणि कतारच्या मध्यस्थीनंतर मानवतेच्या आधारावर आणि खराब प्रकृती लक्षात घेऊन या दोघींची सुटका केल्याचे दहशतवादी गटाने म्हटले आहे.

हमासच्या लष्करी शाखेचे प्रवक्ता अबू उबैदा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर याबद्दल माहिती दिली, गेल्या शुक्रवारीच या दोन महिलांना सोडण्याचा निर्णय घेतला होता, परंतु इस्राइलने त्यांना स्वीकारण्यास नकार दिला होता.

यापूर्वी, शुक्रवारी हमासने दोन अमेरिकी ओलिसांना सोडले होते. यामध्ये आई आणि मुलगी अशा दोघींची सुटका करण्यात आळी होती. हमासने ऑक्टोबर २०१५ मध्ये इस्रायलवर हल्ला केला आणि या दहशतवादी गटाने शेकडो लोकांना ओलीस ठेवले. सध्या त्याच्या ताब्यात किमान २२० ओलिस आहेत.

Hamas frees two Israeli women hostages us advises Israel Hamas War Update
Israel-Hamas War: हमासची क्रूरता! गर्भवती महिलेचं पोट फाडलं अन् न जन्मलेल्या बाळाचीही केली हत्या, इस्राइलचा दावा

या युद्धादरम्यान इस्त्राइली सेनेने गाझा पट्टीला घेराव घाचला होता मात्र जमीनी कारवाई करण्यात आली नाहीये. अमेरिकेने जमीनी हल्ला करणे मोठी चुक ठरू शकते असा इशारा इस्त्राइलाला दिला होता. तसेच अमेरिकेने इस्त्राइलला जमिनीवरून गाझावर हल्ला न करण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून अमेरिकेला हमासच्या ताब्यातून ओलीस सोडवण्यासाठी वाटाघाटी करण्याची संधी मिळू शकेल. तसेच यामुळे गाझाला मानवतावादी मदत पोहचवण्याची संधी देखील मिळेल. वैद्यकीय मदतीला अडथळा होणार नाही, अशी व्यवस्था करण्यासाठी इस्रायलशी बोलणे सुरू आहे असेही अमेरिकेने म्हटले आहे.

Hamas frees two Israeli women hostages us advises Israel Hamas War Update
Israel-Hamas War: "ते माणूस नाहीत! इसिसपेक्षाही भयंकर कृत्ये, लहान बाळांनाही..."; IDF अधिकाऱ्यानं सांगितली भीषणता

दरम्यान कतारसह अन्य मध्यस्थांच्या माध्यमातून हमासच्या तावडीतून ओलिसांची सुटका करण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. कतारच्या प्रयत्नांमुळेच हमासने गेल्या आठवड्यात अमेरिकेतील दोघी ओलिसांची सुटका करण्यात आली. सध्या, हमासच्या ताब्यात २२२ नागरीक ओलिस आहेत, ज्यात अमेरिकेसह अनेक देशांतील लोकांचा समावेश आहे. जमिनीवरील हल्ल्याला होत असलेला उशीर पाहून इस्रायलने गाझा पट्टीवर हवाई हल्ले तीव्र केले आहेत, ज्यामध्ये हमासच्या पायाभूत सुविधा पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात येत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com