हॅरी पॉटरच्या पहिल्या आवृत्तीच्या पुस्तकाला कोट्यवधींची किंमत

हॅरी पॉटरच्या पहिल्या आवृत्तीच्या पुस्तकाला कोट्यवधींची किंमत
Summary

पुस्तकाची जास्ती जास्त किंमत किती असेल याचा अंदाज लावला तर आपण फारतर हजार किंवा लाखात असेल असं म्हणू शकतो.

जगभरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला आश्चर्यचकीत करतात. एखादं पुस्तक किती रुपयांपर्यंत असू शकतं. पुस्तकाची जास्ती जास्त किंमत किती असेल याचा अंदाज लावला तर आपण फारतर हजार किंवा लाखात असेल असं म्हणू शकतो. मात्र लहान मुलांसह मोठ्यांनाही वेड लावणाऱ्या हॅरी पॉटरच्या (Harry Potter) कथा ऐकवणाऱ्या पुस्तकाच्या एका आवृत्तीची विक्री तब्बल साडेतीन कोटी रुपयांहून अधिक किंमतीत झाली आहे. ४ लाख ७१ हजार डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार ३ कोटी ५६ लाख ६२ हजार रुपये इतक्या किंमतीला या पुस्तकाची विक्री झाली आहे.

हॅरी पॉटरची पहिली आवृत्ती अमेरिकेत लिलावासाठी ठेवण्यात आली होती. या पुस्तकाला लिलावात तब्बल ३.५ कोटी रुपये इतकी मिळाली असून हा एक विक्रम ठरला आहे. २० व्या शतकातील हे सर्वात महाग फिक्शन बूक ठरलं आहे. याची पहिली आवृत्ती १९९७ मध्ये प्रकाशित झाली होती. तसंच पुस्तक हार्ड कव्हर बायडिंग होतं. या ब्रिटिश एडिशनचं नाव Harry Potter and the Philosopher’s Stone असं आहे.

विक्रमी किंमत मिळालेल्या पुस्तकाला हेरिटेज ऑक्शन्सने जादुई म्हटलं आहे. ब्रिटिश एडिशनच्या या पुस्तकाला अमेरिकेत “Harry Potter and the Sorcerer’s Stone या नावाने प्रकाशित करण्यात आलं होतं. याआधी जेव्हा पहिली आवृत्ती लिलावासाठी ठेवली होती तेव्हा त्याला १.१ ते १.४ कोटी रुपये इतकी किंमत मिळाली होती. या पुस्तकाची विक्री एका पुस्तकं जमवणाऱ्या माणसाने केली असून खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे नाव जाहिर करण्यात आलेलं नाही.

हॅरी पॉटरच्या पहिल्या आवृत्तीच्या पुस्तकाला कोट्यवधींची किंमत
दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांना कोरोनाची बाधा

हॅरी पॉटरची कथा ब्रिटनच्या लेखिका जे के रोलिंग यांनी लिहिल्या. पुस्तकाच्या ७ आवृत्त्या असून याच्या जगभरात जवळपास ५०० मिलियन कॉपी विकल्या गेल्या आहेत. शिवाय जवळपास ८० भाषांमध्ये अनुवादसुद्धा झाले आहेत. पुस्तकावर ८ चित्रपट तयार झाले असून त्यांनी ग्लोबल बॉक्सऑफिसवर अब्जावधी रुपयांची कमाई केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com