esakal | अमेरिकेच्या इतिहासात जे घडलं नाही त्यासाठी ट्रम्प यांचा हट्ट
sakal

बोलून बातमी शोधा

donald_trump_61_0.jpg

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका पुढे ढकलण्याचे सुतोवाच केले होते.

अमेरिकेच्या इतिहासात जे घडलं नाही त्यासाठी ट्रम्प यांचा हट्ट

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका पुढे ढकलण्याचे सुतोवाच केले होते. युनिवर्सल मेल-ईन पद्धतीने मत देताना मोठा घोटाळा होत आहे. शिवाय कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जाव्यात असं ट्रम्प म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात का? किंवा अमेरिकेच्या इतिहासात कधी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत का? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. 

पाकिस्तानची बालीशपणाची हद्द; काश्मिर ताब्यात घेण्याचे पाहतोय स्वप्न
अमेरिकेत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मंगळवारी निवडणुका घेतल्या जातात. 1845 पासून ही परंपरा सुरु आहे. शिवाय संविधानाच्या अनुच्छेद दोननुसार याचवेळी निवडणुका घेण्यात येतील असं निश्चित करण्यात आलं आहे. यामुळेच तत्कालीन राष्ट्रपती फ्रँकलिन डेलोनो यांना 1940 आणि 1944 मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान निवडणुका पुढे ढकलता आल्या नव्हत्या. त्यामुळे 2020 सालीही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकाही पुढे ढकलल्या जाण्याची सुतराम शक्यता नाही. 

संविधानात बदल करुन निवडणुका पुढे ढकलण्याचं ठरवलं, तरी त्यासाठी काँग्रेसच्या दोन्ही सभागृहात त्याबाबतचा कायदा मंजूर करुन घ्यावा लागेल. मात्र, रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक दोघांचाही निवडणुका पुढे ढकलण्यासाठी नकार आहे. शिवाय सभागृहात डेमोक्रॅटचे वर्चस्व आहे. त्यामुळे रिपब्लिकनने तसं करु पाहिलं तरी ते शक्य नाही. 

देशात फक्त रिलायन्सलाच 'अच्छे दिन'; जिओच्या नफ्यात 183 टक्क्यांनी वाढ
निवडणुकीसाठी घेण्यात येणाऱ्या सर्वेक्षणात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची पिछाडी होताना दिसत आहे. त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुका पुढे ढकलण्याचे सुचवले असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे. ट्रम्प यांना पराभव दिसू लागल्यानेच ते अजब मागणी करु लागले आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी आपले वक्तव्य फिरवले आहे. नोव्हेंबरधील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका नियोजित वेळेत होतील. मला माहित आहे की निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकत नाहीत, असं ट्रम्प म्हणाले आहेत.