
बीजिंग - वार्तांकनाशी संबंधित कारणांसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व पत्रकार तसेच नागरिकांची चीनने सुटका करावी, असे आवाहन युरोपीय महासंघाने केले आहे.
ब्लूमबर्ग न्यूजची चिनी कर्मचारी हेझ फान हिला गेल्या सोमवारी साध्या वेषातील सुरक्षा अधिकाऱ्यांनी तिच्या घरातून ताब्यात घेतले. राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या पार्श्वभूमीवर युरोपीय महासंघाने एक निवेदन जारी केले. वार्तांकनाबद्दल ताब्यात घेतलेल्या सर्वांची तातडीने सुटका व्हावी. यंदा वार्तांकनाबद्दल इतर चिनी पत्रकार किंवा नागरिक यंदा बेपत्ता होण्याचे, त्यांना ताब्यात घेतले जाण्याचे किंवा त्याचा छळ केला जाण्याचे प्रकार घडले आहे. फान हिला वैद्यकीय मदतीची गरज असल्यास चिनी अधिकारी ती देतील अशी अपेक्षा आहे. याशिवाय आपल्या पसंतीच्या वकिलांशी संपर्क साधण्याची त्वरेने संधी तिला मिळेल, तसेच ती कुटुंबियांशीही संपर्क साधू शकेल अशी अपेक्षा आहे.
फान हिच्या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे सांगण्यात आले आहे.
वार्तांकनाचा चिनी दंडक
चीनमधील परदेशी वृत्तसंस्थांसाठी वार्ताहर म्हणून काम करण्यास चीनच्या नागरिकांना सरकारने बंदी घातली आहे. ते केवळ वृत्तसहाय्यक म्हणून काम करू शकतात. फान २०१७ मध्ये ब्लूमबर्गमध्ये दाखल झाली. आर्थिक विषयांवरील अनेक बातम्यांसाठी तिने वार्तांकनात योगदान दिले.
ब्लुमबर्गला चिंता
बीजिंग ब्युरोमध्ये काम करणाऱ्या फान हिच्या अटकेमुळे तीव्र चिंता वाटत असल्याचे ब्लुमबर्गतर्फे सांगण्यात आले. मुख्य संपादक जॉन मिकलथ्वैत यांनी सांगितले की, फान हिला परत आणता यावे म्हणून संस्था शक्य ती प्रत्येक गोष्ट करीत आहे. अटक होण्यापूर्वी त्या दिवशी फान ही जॉन यांच्या संपर्कात होती. ती कुठे आहे याची माहिती घेण्यासाठी संस्थेतर्फे चीन सरकार तेच वॉशिंग्टन येतील चिनी वकिलातीशी संपर्क साधण्यात आला होता.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
इतर प्रकरणे
चिनच्या सरकारची मालकी असलेल्या सीजीटीएन (चायना ग्लोबल टेलीव्हीजन नेटवर्क) वाहिनीची अँकर चेंग लेई हिला काही महिन्यांपूर्वी अटक झाली. चीनमध्ये जन्मलेली ही ऑस्ट्रेलियन पत्रकार तेव्हापासून सार्वजनिक ठिकाणी एकदाही दिसलेली नाही. चेंग हिच्यावरही राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियन पत्रकारांचे पलायन
चेंग हिच्याबाबत चौकशी करताच ऑस्ट्रेलियन पत्रकार मायकेल स्मिथ आणि बील बर्टलेस यांच्याकडे चौकशी करण्यात आली. यानंतर काही दिवसांत हे दोघे ऑस्ट्रेलियाला परतले. त्यांना पलायन करणे भाग पडले. त्यामुळे १९७३ पासून प्रथमच ऑस्ट्रेलियाचा एकही पत्रकार चीनमध्ये नाही. ऑस्ट्रेलिया आणि चीन यांच्यातील संबंध विकोपाला जाण्यात हे एक महत्त्वाचे कारण मानले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.