कोरोनामुळे आई जीव सोडत होती; तो खिडकीत बसून तिला शेवटचं पाहत होता

कार्तिक पुजारी
Monday, 20 July 2020

ह्रद्यस्पर्शी आणि काळीज पिळवटून टाकणारा एक फोटो सध्या समाज माध्यमात व्हायरल होत आहे. यात एक पॅलेस्टिनी तरुण जिहाद एल सुवैती नावाचा आपल्या आईला शेवटचं पाहण्यासाठी धडपडतोय.

पूर्व जेरुसलम- ह्रद्यस्पर्शी आणि काळीज पिळवटून टाकणारा एक फोटो सध्या समाज माध्यमात व्हायरल होत आहे. यात एक पॅलेस्टिनी तरुण जिहाद एल सुवैती नावाचा आपल्या आईला शेवटचं पाहण्यासाठी धडपडतोय. काही दिवसांपूर्वी जिहादची आई कोविड पॉझिटिव्ह आढळली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिची तब्येत अत्यंत बिघडल्याने डॉक्टरांनी जिहादला आता ती वाचणार नाही असं सांगितलं होतं. कोरोना सारख्या गंभीर आजारामुळे डॉक्टरांनी जिहादला त्याच्या आईजवळ थांबू दिलं नाही. 

पंतप्रधान मोदी स्वतःच्या प्रेमात; राहुल गांधींचा टोला
आपल्या जन्मदात्या आईला आपण पुन्हा कधीच पाहू शकणार नाही, या विचारानेच जिहाद सून्न झाला. मात्र, जिहादला त्याच्या आईची माया शांत बसू देत नव्हती. जिहाद रुग्णालाच्या भींती चढून त्याच्या आईला ज्या रुममध्ये ठेवण्यात आले होते, त्या खोलीच्या खिडकीमध्ये जाऊन बसला. आईने आपला प्राण सोडेपर्यंत तो खिडकीत बसून होता. या घटनेचा फोटो समाध माध्यमामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जिहादचं त्याच्या आईच्या प्रति असलेलं प्रेम पाहून अनेकांचे डोळे पानावले आहेत.

मृत्यू हा जीवनाचा एक अपरिहार्य भाग आहे. कोणाला आवडो किंवा न आवडो सर्वांनाच एके दिवशी हे जग सोडून जायचं आहे. पण कोणीतरी प्रिय आपल्या जिवनातून निघून जाणं नेहमीच दुखदायी असतं. कोरोना महामारी आपल्या सर्वांसाठी दु:ख घेऊन आली आहे. कोरोनामुळे अनेकांना आपल्या प्रियजनांना गमवावं लागत आहे. त्यात अधिक दुखदायक म्हणजे आपल्या प्रियजनांना शेवटचा निरोपही देता न घेणे. या महामारीने जवळच्या मानसांना एकमेकांपासून दूर केलं आहे. कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारालाही त्यांच्या कुटुंबीयांना जाता येणं अशक्य झालं आहे.

दिल्लीचा रिकव्हरी रेट देशात सर्वाधिक; हजारो नागरिक करताहेत कोरोनावर मात
जिहादलाही याची जाणीव झाली होती की, तो आता आपल्या आईला कधीही पाहू शकणार नाही. त्यामुळेच त्याला आईला शेवटचं तरी डोळेभरुन पाहायचं होतं. तो भींत चढला आणि  खिडकीत बसून अश्रूंनी भरल्या डोळ्याने आईकडे पाहत राहिला. आपल्या आईची शेवटची प्रतिमा तो डोळ्यात साठवू लागला. खूप वेळ तो खिडकीत बसून होतो, जणू यमाला येण्यापासून तो अडवत होता. पण शेवटी त्याची आई गेलीच.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: He was sitting at the window looking at his mother for the last time

Tags
टॉपिकस
Topic Tags: