अमेरिकेत पूर; व्हाईट हाऊसमध्ये शिरले पाणी

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 जुलै 2019

- अमेरिकेत होतोय मुसळधार पाऊस.

- व्हाईट हाऊससह परिसरात पाणीच पाणी.

वॉशिंग्टन : अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे परिसरात पूर आला असून, व्हाईट हाऊससह जवळपासच्या परिसरात पाणी शिरले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याचे दिसत आहे. वॉशिंग्टनमधील बऱ्याच भागांमध्ये पाणी शिरले असून, लोक गाड्यांवर उभे राहून बाहेर पडण्यासाठी मदत मागत आहेत. या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सदर्न मोंटगोमरी, नॉर्थवेस्टर्न डीसी, ईस्ट सेंट्रल लॉडन काऊंडी, फॉल्स चर्च येथील लोकांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.  

दरम्यान, दक्षिण वॉशिंग्टनमधील ट्रेन सेवाही रद्द करण्यात आली आहे. ही परिस्थिती आणखी किती दिवस कायम राहील, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rains in Washington White House basement flooded