esakal | उच्चशिक्षीत भारतीयांचा ओढा आता कॅनडाकडे
sakal

बोलून बातमी शोधा

Canada

उच्चशिक्षीत भारतीयांचा ओढा आता कॅनडाकडे

sakal_logo
By
पीटीआय

टोरांटो - उच्च कौशल्ये असलेल्या भारतीय (Indian) तंत्रज्ञांचा ओढा कॅनडाकडे (Canada) वाढत असून अमेरिकेचे त्यांचे आकर्षण कमी झाले आहे. या बदलाला अमेरिकेचे कालबाह्य ठरलेले व्हिसाधोरण कारणीभूत असल्याचा अहवाल तज्ज्ञांनी अमेरिकेच्या संसदेला सादर केला आहे. प्रत्येक देशाला व्हिसाचा (Visa) कोटा ठरवून दिल्याने अनेक उच्चशिक्षीत (High Educated) भारतीय कॅनडाला जात आहेत. अमेरिकेच्या हितासाठी या भारतीयांना पुन्हा आकषूर्ण घेण्यासाठी योग्य ते करावेत, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. (Highly Educated Indians are now Flocking to Canada)

अमेरिकेत ग्रीन कार्डसाठी भारतीयांचे नऊ लाखांहून अधिक अर्ज प्रलंबित आहेत. ही संख्या २०३० पर्यंत सुमारे २२ लाखांपर्यंत जाणार आहे. हे सर्व जण अनेक वर्षे अमेरिकेचे नागरिकत्व मिळविण्याची वाट पहात आहेत. त्यामुळे इतर भारतीयही अर्ज करताना दुसऱ्या पर्यायाचाही शोध घेत आहेत. त्यामुळे अमेरिका सरकारने प्रयत्नपूर्वक ही संख्या कमी करावी, असे मत ‘नॅशनल फौंडेशन फॉर अमेरिकन पॉलिसी’चे कार्यकारी संचालक स्टुअर्ट अँडरसन यांनी संसदीय समितीसमोर सांगितले. ‘अमेरिकेच्या कालबाह्य धोरणांमुळे अत्यंत हुशार विदेशी विद्यार्थी आणि कर्मचारी कॅनडाची निवड करत आहेत. आपल्या एच-१बी धोरणाअंतर्गत काम करणे किती अवघड बनत चालले आहे, हेच यावरुन सिद्ध होते आहे. कॅनडात मात्र विदेशी विद्यार्थ्यांना अनेक सवलती मिळत आहेत,’ असे अँडरसन यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: दक्षिण अफ्रिकेत दंगल; 'गुप्ता ब्रदर्स' ठरले आणीबाणीला कारणीभूत

ठळक आकडेवारी

  • गेल्या वर्षी एच-१ बी व्हीसासाठीचे ७२ टक्के अर्ज नाकारले

  • अमेरिकी विद्यापीठांमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत २५ टक्क्यांनी घट

  • कॅनडामध्ये शिकण्यासाठी जाणाऱ्या भारतीयांची संख्या ७६ हजारांहून (२०१६) १ लाख ७२ हजारांवर (२०१८)

loading image