esakal | दक्षिण अफ्रिकेत दंगल; 'गुप्ता ब्रदर्स' आणीबाणीला ठरले कारणीभूत
sakal

बोलून बातमी शोधा

South Africa riots

दक्षिण अफ्रिकेत दंगल; 'गुप्ता ब्रदर्स' ठरले आणीबाणीला कारणीभूत

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : दक्षिण अफ्रिकेत मोठी दंगल उसळली असून याला भारतातील मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले गुप्ता भावंडं कारणीभूत ठरले आहेत. दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष जॅकोब झुमा यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली १५ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. त्यामुळे जॅकोब यांच्या समर्थकांकडून हिंसाचार केला जात आहे. झुमा यांच्या भ्रष्टाचाराचा थेट गुप्ता बंधूंशी संबंध आहे. झुमा यांच्यासह या गुप्ता ब्रदर्सनेही गैरकारभाराचे आरोप नाकारला आहेत. (Big riots in South Africa Indian Gupta Brothers caused an emergency aau85)

हेही वाचा: लष्करी कर्मचारीच निघाला ‘घरचा भेदी’; ‘ISI’च्या हस्तकासह दोघांना अटक

दक्षिण अफ्रिकेतील कोर्टानं झुमा यांना भ्रष्टारासंबंधीची कागदपत्र आणि पुरावे कोर्टासमोर सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, झुमा यांनी कोर्टाच्या या आदेशाचे उल्लंघन करत ही कागदपत्रे सुपूर्द करण्यास नकार दिला होता. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेचे उपाध्यक्ष न्या. रायमंड झोंडो यांनी झुमा यांना १५ वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.

हेही वाचा: आरोपी विक्रम भावेच्या वडिलांचे निधन, गावी जाण्यासाठी हायकोर्टाची परवानगी

झुमा यांना शिक्षा सुनावल्यानंतर दक्षिण अफ्रिकेत त्यांच्या समर्थकांकडून राडा सुरु असून ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. या हिंसाचारात आजवर ७० जणांना प्राणाला मुकावे लागले आहे. १९९० मध्ये वर्णभेदामुळे झालेल्या मोठ्या हिंसाचारानंतर पहिल्यांदाच दक्षिण अफ्रिकेत इतका मोठा हिंसाचार उफाळून आला आहे.

काय आहे प्रकरण?

जॅकोब झुमा यांच्यावर दोन मोठ्या भ्रष्टाचाराचे खटले दाखल आहेत. यामध्ये सन १९९९ मध्ये जॅकोब जेव्हा दक्षिण अफ्रिकेची उपाध्यक्ष होते तेव्हा २ बिलियन डॉलरची शस्त्रास्त्र खरेदी प्रकरणी भ्रष्टाचार झाला होता. तर दुसरा भ्रष्टाचार जॅकोब दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्ष असताना २००९ ते २०१८ या काळात घडलेला आहे. याच प्रकरणात कोर्टानं कागदपत्रे सुपूर्द करण्याचे आदेश दिल्यानंतरही कोर्टाचे आदेश धुडकावत जॅकोब यांनी चौकशी पॅनलला सहकार्य करण्यास नकार दिला आहे.

गुप्ता बंधूंचा काय आहे संबंध?

जॅकोब यांच्या भ्रष्टाचारामध्ये तीन भारतीय उद्योजकांचा समावेश असल्याचं समोर आंलं आहे. यामध्ये अतुल गुप्ता, अजय गुप्ता आणि राजेश गुप्ता अशा तीन मूळ भारतीय उद्योजकांची नावं आहेत. या तिघांवरही ‘राज्य संसाधनांची लूट’ केल्याचे आणि सरकारी धोरणावर प्रभाव टाकण्याचे आरोप आहेत. गुप्ता ब्रदर्सच्या सहकार्याने, जेकब झुमा यांनी राज्य हस्तगत केले तसेच राज्याची मालमत्ता लुटली, एकेकाळी गुप्ता ब्रदर्स इतके प्रभावी होते की त्यांनी जेकब झुमा सरकारची धोरणं ठरविली होती. सन 2018 मध्ये याकूब झुमा यांना सत्तेतून पायउतार होण्यास भाग पाडल्यानंतर गुप्ता ब्रदर्स दक्षिण आफ्रिकेतून पळून गेले.

loading image