World Hindi Day 2024 : भारताच्या व्यतिरिक्त 'या' देशांमधील लोक बेधडकपणे बोलतात हिंदीत

जगामध्ये इंग्रजी आणि मॅंडरीन या भाषांनंतर हिंदी ही अशी तिसरी भाषा आहे, जी सर्वाधिक बोलली जाते. भारत असो किंवा परदेश, जगभरातील असंख्य लोक एकमेकांशी संवाद साधण्यासाठी हिंदी भाषेचा वापर करतात.
World Hindi Day 2024
World Hindi Day 2024esakal

World Hindi Day 2024 : जगामध्ये इंग्रजी आणि मॅंडरीन या भाषांनंतर हिंदी ही अशी तिसरी भाषा आहे, जी सर्वाधिक बोलली जाते. भारत असो किंवा परदेश, जगभरातील असंख्य लोक एकमेकांशी संवाद साधण्यासाठी हिंदी भाषेचा वापर करतात. मागील काही वर्षांपूर्वी जगभरात अशी परिस्थिती होती की, लोक फक्त इंग्रजी भाषेकडे झुकत होते. परंत, आता तसे नाही. आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.

आजकाल अनेक देशांमध्ये हिंदी भाषा बोलली जाते. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी हिंदीचा वापर केला जातो. त्यामुळेच, तर दरवर्षी जगभरात १० जानेवारीला ‘जागतिक हिंदी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आज जागतिक हिंदी दिन आहे.

हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू हा आहे की, लोकांना राजभाषा असलेल्या हिंदी भाषेचे महत्व कळावे, लोक या भाषेकडे आकर्षित व्हावेत आणि भविष्यातील आपल्या भावी पिढ्यांना हिंदी भाषेची ओळख व्हावी.

आज जागतिक हिंदी दिनानिमित्त आम्ही तुम्हाला अशा काही देशांबद्दल सांगणार आहोत. जिथे हिंदी भाषा केवळ लोकांना समजत नाही, तर तेथील लोक हिंदी भाषा अतिशय चांगल्या प्रकारे बोलतात. चला तर मग जाणून घेऊयात या देशांबद्दल.

World Hindi Day 2024
World Hindi Diwas: महाराष्ट्रात भरलं होतं पहिलं जागतिक हिंदी संमेलन; जाणून घ्या 10 खास गोष्टी

फिजी

फिजी हा देश दक्षिण प्रशांत महासागरातील मेलनेशियामध्ये आहे. हा देश एकप्रकारचे बेट आहे, जे पूर्णपणे निसर्गसंपन्न आहे. या देशाला ‘मिनी हिंदुस्थान’ असे ही म्हटले जाते. या देशात हिंदी भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा आहे. येथे तुम्हाला ईशान्य भारतातील कित्येक लोक भेटतील जे चांगल्या प्रकारे हिंदी भाषेत बोलतात.

नेपाळ

भारताचा सख्खा शेजारी म्हणून नेपाळ या देशाची खास अशी ओळख आहे. या देशात भेट द्यायला दरवर्षी अनेक भारतीय जातात. नेपाळमध्ये अनेक जण हिंदी बोलतात. तिथली अधिकृत भाषा नेपाळी जरी असली तरी सुद्धा या देशात मैथिली, भोजपुरी आणि हिंदी बोलणारे लोक सहज सापडतील.

बांग्लादेश

काही काळापूर्वी बांग्लादेश हा देश भारताचा भाग होता. नेपाळनंतर बांग्लादेश हा देखील भारताचा जवळचा मित्रदेश आहे. या देशामध्ये बंगाली भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते. बंगाली ही या देशाची अधिकृत भाषा आहे, तरी सुद्धा या देशातील लोक हिंदी चांगल्या प्रकारे बोलतात. हिंदी, बंगालीसोबत इंग्रजी भाषा सुद्धा या देशात बोलली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com