बांगलादेशात हिंदुविरोधी कारवाया सातत्याने वाढत आहेत. तेथील हिंदू आणि बौद्ध अल्पसंख्याक समुदायांसाठी गंभीर चिंतेची बाब आहे. मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारवर हिंदूंना प्रशासकीय आणि सामाजिक सेवेच्या मुख्य प्रवाहातून वगळण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. अलीकडेच असे अनेक अहवाल समोर आले आहेत ज्यात बीसीएस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अनेक हिंदू उमेदवारांची नावे रद्द करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.