पाकिस्तानमध्ये हिंदू नवरीचे अपहरणानंतर धर्मांतर करून लावले लग्न

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 जानेवारी 2020

या मुलीचे कुटुंबीय हिंदू पंचायतीकडे गेले असता पोलिसांकडे याची तक्रार करण्यात आली. कराचीजवळून त्यांच्या मुलीला परत आणण्याची मागणी कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली आहे. त्यानंतर पोलिसांनी तिला पुन्हा आणले आणि हाला न्यायालयात सादर केले.

अमृतसर : पाकिस्तानमधील सिंध प्रांतात एका हिंदू अल्पवयीन नवरीचे विवाहस्थळावरून अपहरण करून तिचे मुस्लिम युवकाशी लग्न लावल्याची घटना घडली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिरावर हल्ला झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर आता एका हिंदू मुलीचे अपहरण करून तिची बळजबरी विवाह केल्याचे समोर आले आहे. याविषयी बोलताना ऑल पाकिस्तान हिंदू पंचायतच्या सचिव रावी दवानी यांनी सांगितले, की पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू धर्मातील युवतींना लक्ष्य करण्यात येत आहे. पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांतील ही तिसरी घटना आहे. सिंध प्रांतातून एका 15 वर्षीय नवरीचे अपहरण करून तिचे मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतर करण्यात आले. त्यानंतर तिचा एका मुस्लिम युवकाशी विवाह लावण्यात आला. सिंध प्रांतातील मतिअरी जिल्ह्यातील हाला या गावात राहत असलेली ही युवती सध्या कराचीजवळील बनोरिया या गावात आहे. 

या मुलीचे कुटुंबीय हिंदू पंचायतीकडे गेले असता पोलिसांकडे याची तक्रार करण्यात आली. कराचीजवळून त्यांच्या मुलीला परत आणण्याची मागणी कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली आहे. त्यानंतर पोलिसांनी तिला पुन्हा आणले आणि हाला न्यायालयात सादर केले. न्यायालयाने अपहरण करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hindu girl abducted from wedding venue converted married in Pakistan