esakal | पाकमध्ये पहिल्यांदा हिंदु युवती बनली पोलिस अधिकारी
sakal

बोलून बातमी शोधा

Pushpa Kohli

पाकिस्तानमध्ये प्रथमच एक हिंदू युवती पोलिस अधिकारी बनली आहे.

पाकमध्ये पहिल्यांदा हिंदु युवती बनली पोलिस अधिकारी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

इस्लामाबादः पाकिस्तानमध्ये प्रथमच एक हिंदू युवती पोलिस अधिकारी बनली आहे, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी आज (बुधवार) दिली.

पुष्पा कोहली असे पोलिस अधिकारी झालेल्या युवतीचे नाव असून, स्पर्धा परिक्षेद्वारे ती सहाय्यक पोलिस निरीक्षक ही परिक्षा उत्तीर्ण झाली आहे. पाकिस्तानी मानवी हक्कासाठी काम करणारे कपील देव यांनी ट्विटरवरून ही माहिती सर्वप्रथम प्रसिद्ध केली.

हिंदू समुदयामधील सुमन पवन बोदानी या जानेवारी महिन्यामध्ये न्यायाधीश म्हणून रुजू झाल्या आहेत. पाकिस्तानमध्ये 75 लाख हिंदू नागरिक राहतात. सिंध प्रांतामध्ये हिंदू नागरिकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे.

loading image
go to top