
यापूर्वी 17 जानेवारीला खलिस्तानी समर्थकांनी व्हिक्टोरियातील कार्रुम डॉन्स येथील शिव विष्णू मंदिरावर हल्ला केला होता.
Australia : 'खलिस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान मुर्दाबाद' म्हणत हिंदू मंदिरावर पुन्हा हल्ला
सध्या ऑस्ट्रेलियातून (Australia) एक मोठी बातमी समोर येत आहे. येथील हिंदू मंदिर पाडण्यात आलं आहे. मेलबर्नच्या अल्बर्ट पार्कमध्ये असलेल्या हिंदू मंदिराची (Hindu Temple) खलिस्तान (Khalistan) समर्थकांनी तोडफोड केलीये.
गेल्या 15 दिवसांत मेलबर्नमधील मंदिरावरील हा तिसरा हल्ला आहे. इस्कॉन मंदिर, ज्याला हरे कृष्ण मंदिर (Hare Krishna Temple) असंही म्हणतात. मेलबर्न हे भक्ती योग चळवळीचं प्रसिद्ध केंद्र आहे. सोमवारी सकाळी मंदिर व्यवस्थापनाला मंदिराची तोडफोड झाल्याचं दिसून आलं. 'खलिस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान मुर्दाबाद' अशा घोषणाही भिंतींवर लिहिण्यात आल्या होत्या.
हेही वाचा: Lord Shri Ram : भगवान राम सीतेसोबत दररोज बसून मद्य प्यायचे; प्रसिद्ध लेखकाचं वादग्रस्त विधान
इस्कॉन मंदिराचे संचालक भक्त दास म्हणाले, 'हिंदू मंदिरावर झालेला हा हल्ला अत्यंत निंदनीय आहे. या प्रकारामुळं आम्ही दु:खी झालो आहोत.' इस्कॉन मंदिरातील आयटी सल्लागार शिवेश पांडे म्हणाले, 'व्हिक्टोरिया पोलीस हिंदू समाजाविरुद्ध द्वेषी अजेंडा चालवणाऱ्यांविरुद्ध कोणतीही कारवाई करत नाहीये. यापूर्वी 12 जानेवारीला खलिस्तान समर्थकांनी मंदिरावर हल्ला केला होता. यानंतर अवघ्या 5 दिवसांनी आणखी एका मंदिराला लक्ष्य करण्यात आलं आहे.'
हेही वाचा: 'ती' तुम्हाला 3 हजार देत असेल, तर आम्ही एका मतासाठी 6 हजार देऊ; भाजपच्या बड्या नेत्याची मतदारांना 'ऑफर'
यापूर्वी 17 जानेवारीला खलिस्तानी समर्थकांनी व्हिक्टोरियातील कार्रुम डॉन्स येथील शिव विष्णू मंदिरावर हल्ला केला होता. तमिळ हिंदू समाजाचा तीन दिवस चालणारा सण थाई पोंगल या दिवशी भाविक दर्शनासाठी मंदिरात पोहोचले असताना मंदिरात तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली. याशिवाय, 12 जानेवारीला समाजकंटकांनी मेलबर्नमधील स्वामीनारायण मंदिरात भारतविरोधी शब्द लिहून विटंबना केली होती.