आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवसाचा इतिहास आणि महत्व

दरवर्षी 3 डिसेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
International Day of Persons with Disabilities 2021
International Day of Persons with Disabilities 2021sakal
Updated on

‘आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस’ 2021 (International Day of Persons with Disabilities):

दरवर्षी 3 डिसेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस’ म्हणून साजरा केला जातो. समाजातील सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींचे हक्क आणि कल्याण साधलं जावं, या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो. जगाच्या एकूण 7 अब्ज लोकसंख्येपैकी सुमारे एक अब्ज व्यक्तींना (जगाच्या लोकसंख्येच्या अंदाजे 15 टक्के) कोणत्याना कोणत्या प्रकारचं अंपगत्व घेऊन जीवन जगावं लागत आहे. विशेष म्हणजे एकूण दिव्यांग लोकसंख्येपैकी तब्बल 80 टक्के लोक विकसनशील देशांमध्ये राहतात. जगभरातील एकूण दिव्यांगांमध्ये लहान मुलांची संख्या 100 दशलक्षाहून अधिक आहे. आरोग्य, सामाजिक आणि आर्थिक यांसारख्या जागतिक समस्यांचा मोठा परिणाम दिव्यांग लोकांवर होत असतो. जगाच्या शाश्वत विकासामध्ये दिव्यांग लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी हा दिवस पाळला जातो.

International Day of Persons with Disabilities 2021
दिव्यांग आरिफ अन्‌ संगीताची प्रेमकहाणी! सुखी संसाराची तपपूर्ती

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवसाची थीम- यंदाच्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवसाची थीम कोविड-19 नंतरच्या सर्वसमावेशक आणि शाश्वत जगाकडे दिव्यांग व्यक्तींचे नेतृत्व आणि सहभाग (Leadership and participation of persons with disabilities toward an inclusive, accessible and sustainable post-COVID-19 world) ही आहे.

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवसाची थीम- सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनातील प्रत्येक पैलूमध्ये अपंग व्यक्तींना भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने 1992 मध्ये युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीच्या ठराव 47/3 मतांनी मंजूर झाला आणि दरवर्षी 3 डिसेंबरला आंतराष्ट्रीय दिव्यांग दिवस साजरा केला जाऊ लागला.

दिव्यांगांच्या क्षेत्रातील अनेक वर्षाच्या दशके काम केल्यानंतर, 2006 मध्ये दिव्यांगांच्या कल्याणासाठी CRPD (Convention on the Rights of Persons with Disabilities) अस्तित्वात आली. CRPD ने दिव्यांग व्यक्तींचा शाश्वत विकास आणि कल्याणासाठी 2030 पर्यंतचा अजेंडा सेट केला आहे.

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवसाचे महत्त्व:

आरोग्याच्या समस्या, शिक्षणातील समान संधींचा अभाव आणि बऱ्याचदा कामात होणार त्रास या गोष्टींचा दिव्यांगाना सतत सामना करावा लागतो, यामुळे त्यांच्या जीवनशैलीवर तसेच शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो. म्हणूनच, जगाला त्यांच्या समस्यांबद्दल जागरूक करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी समाजात पूरक वातावरण निर्मिती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com