दिव्यांग आरिफ अन्‌ संगीताची प्रेमकहाणी! सुखी संसाराची तपपूर्ती

भिन्नधर्मीय दिव्यांग आरिफ अन्‌ संगीताची प्रेमकहाणी! सुखी संसाराची तपपूर्ती
दिव्यांग आरिफ अन्‌ संगीताची प्रेमकहाणी! सुखी संसाराची तपपूर्ती
दिव्यांग आरिफ अन्‌ संगीताची प्रेमकहाणी! सुखी संसाराची तपपूर्तीesakal
Updated on
Summary

दोन आंतरधर्मीय दिव्यांगांमध्ये फुलले प्रेम... दोघांनीही घरातील नातेवाइकांचा आणि जातबांधवांचा विरोध पत्करून लग्न केले.

सोलापूर : दोन आंतरधर्मीय दिव्यांगांमध्ये (Handicap) फुलले प्रेम (Love)... दोघांनीही घरातील नातेवाइकांचा आणि जातबांधवांचा विरोध पत्करून लग्न (Marriage) केले... लग्नानंतरही काही काळ दोन्ही कुटुंबीयांकडून विरोध कायम होता... मात्र, या दोन दिव्यांगांच्या पोटी कोणतेही अंपगत्व नसलेले सुदृढ बाळ जन्माला आल्यानंतर दोन्ही कुटुंबांनी त्यांचा स्वीकार केला... आज बारा वर्षीय मुलासह स्वत:च्या घरात त्यांचा संसार सुखात सुरू आहे. सोलापूर (Solapur) जिल्हाधिकारी कार्यालय (Collector Office) परिसरात नागरिकांना अर्ज, निवेदने लिहून देण्याचे दोघेही काम करतात. स्वत:च्या पायावर उभा राहात आत्मनिर्भर होणाऱ्या आरिफ (Arif) अन्‌ संगीताचा (Sangita) वैवाहिक जीवन प्रवास प्रेरणादायी आहे.

दिव्यांग आरिफ अन्‌ संगीताची प्रेमकहाणी! सुखी संसाराची तपपूर्ती
ना पावसाळा, ना हिवाळा... हा तर हिवसाळा! 'सोशल'वर व्हायरल मिम्स

आरिफ अत्तार हे दिव्यांग आहेत. आरिफ हे सोलापुरातील शास्त्रीनगरातील रहिवासी. त्यांचे वडील बेकरी व्यावसाय कारायचे. आरिफ यांचा जन्म होताना ते इतर दोन भाऊ व बहिणीप्रमाणे नॉर्मलच होते. दोन वर्षांचे असताना त्यांना ताप आला आणि पोलिओमुळे कायमचे अंपगत्व आले. दोन्ही पायांनी अपंग असल्याने ते तीनचाकी सायकलने फिरतात. दहावी नापास झालेल्या आरिफ यांना विष्णू लाड या अस्थिव्यंग मित्राची साथ लाभली आणि त्यांनी आरिफला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकांचे अर्ज लिहून देण्याचे काम शिकवले. आरिफ हे 2003 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपली तीनचाकी सायकल घेऊन लोकांची निवेदने, अर्ज लिहून देण्याचे काम करतात. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे.

दिव्यांग आरिफ अन्‌ संगीताची प्रेमकहाणी! सुखी संसाराची तपपूर्ती
'महाविकास'च्या अडीच वर्षांनंतर प्रणिती शिंदेंना मंत्रिपद?

संगीता आतार यादेखील मूळच्या सोलापूरच्याच. 2006 पासून त्यादेखील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लेखनिकाचे काम करतात. येथेच त्यांचे आणि आरिफ यांचे सूर जुळले. दोघांचा धर्म वेगळा असल्यामुळे दोन्ही कुटुंबांतून प्रारंभी विरोध झाला. 2009 मध्ये घरातील नातेवाइकांचा आणि जातबांधवांचा विरोध पत्करून संगीता व आरिफ अत्तार यांनी विवाह केला. दोघांनी घरातील लोकांना न सांगताच नोंदणी पद्धतीने विवाह केला. आरिफ आणि संगीता यांच्या संसाराच्या वेलीवर कोणतेही अपंगत्व नसलेले सुदृढ मूल जन्माला आले. मुलाच्या जन्मानंतर मात्र दोन्ही कुटुंबीयांकडून होणारा विरोध मावळला आहे. संगीता व आरिफ यांच्या पोटी जन्मलेला आयान आता बारा वर्षांचा झाला आहे. शास्त्रीनगर परिसरात स्वत:च्या घरात त्यांचा सुखी संसार सुरू आहे. स्वत:चे घर होऊन स्वाभीमानाने आत्मनिर्भर झाल्याने दोघेही समाधानी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Critically Ill Woman Waits in Pain as Railway Help Delayed at Solapur Station
Pandharpur Banana Farms Devastated, Raising Concerns Over Farmer Compensation
Gyan Bharatam Project Aims to Protect and Digitize India’s Rich Manuscript Legacy
load shedding lights in solapur
Marathi News Esakal
www.esakal.com