काय सांगता! कोणतेही औषध न घेता HIV रुग्ण झाला बरा

hiv.jpg
hiv.jpg

नवी दिल्ली- इतिहासात पहिल्यांदाच असं घडून आलं आहे की, कोणत्याही उपचाराशिवाय एचआयव्ही HIV आजार बरा झाला आहे. मानवी शरीरातील रोग प्रतिकारशक्तीने या विषाणूला पूर्णपणे नष्ट केले आहे. या आश्चर्यकारण घटनेने जगभरातील वैज्ञानिक आणि डॉक्टर हैराण झाले आहेत. एचआयव्हीवर कोणताही इलाज नाही,ज्याला हा आजार झाला, त्याला आयुष्यभर गोळ्या आणि इतर उपचार करावे लागतात. त्यामुळे HIV आपसूक बरा होणे मोठी घटना मानली जात आहे.

नऊ महिन्यांनी डॉक्टरची सुटका; ते हेट स्पीच नव्हे एकता वाढवणारे भाषण : HC

याआधी दोन व्यक्तींच्या शरीरात बोन मैरो ट्रान्सप्लांट करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या शरीरात HIV विषाणू मोठ्या गतीने कमी झाल्याचे पाहायला मिळाले आणि पुन्हा हा विषाणू दिसून आला नाही. शरीरातील इम्यून सिस्टिम आपसूक HIV विरोधात लढून त्याला नष्ट केल्याची घटना पहिल्यांदाच घडली. तेही कोणत्या बाहेरील मदतीशिवाय.

हे प्रकरण समोर आल्यानंतर डॉक्टरांनी शरीरातील १.५ अब्ज म्हणजे १५० कोटी कोशिकांची तपासणी केली. या रुग्णाला EC2 असं नाव देण्यात आले होते. २६ ऑगस्ट रोजी साईन्स मॅगझीन नेचरने प्रकाशित केलेल्या रिपोर्टच्या अनुमानानुसार, या रुग्णाच्या शरीरात HIV चे सक्रिय विषाणू आढळले नाहीत. याचा अर्थ असा होतो की, हा रुग्ण HIV  ने संक्रमित झाला आणि आपसूक बराही झाला.

एका दुसऱ्या व्यक्तीचीही चाचणी घेण्यात आली. याचे नाव EC1 असं ठेवण्यात आले होते. या रुग्णाच्या शरीरातील १०० कोटी कोशिकांची तपासणी घेतल्यानंतर केवळ १ सक्रिय विषाणू आढळून आला. पण हा विषाणूही जेनेटिकली निष्क्रिय निघाला. याचा अर्थ या दोन्ही रुग्णांची अनुवंशिकता अशी आहे की, त्यांच्या शरीरातील HIV ची सक्रियता नष्ट झाली आहे.

वैद्यानिकांनी तपासानंतर या दोन्ही रुग्णांना एलीट कंट्रोलर्स (EC) असे नाव ठेवले आहे. ज्या लोकांच्या शरीरात HIV आहे, पण तो पूर्णपणे नष्ट झालेला किंवा खूप कमी प्रमाणात आहे आणि याला कोणत्याही उपचाराशिवाय बरे केले जाऊ शकते, याला EC म्हटले जाते. या रुग्णांमध्ये HIV ची लक्षणे किंवा यामुळे होणारे नुकसानही पाहायला मिळाले नाही.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कॅलिफोर्निया यूनिवर्सिटीमध्ये HIV वर शोध करणारे सत्या दांडेकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. काही महिन्याची किंवा काही वर्षांची ही गोष्ट दिसत नाही. खूप काळानंतर विकसित होणारा हा इम्यून सिस्टिम दिसत आहे. जगात ३.५० कोटी लोक HIV ने संक्रमित आहे. यातील ९९.५० टक्के रुग्णांना दररोज HIV चे औषध अँटीरेट्रोव्हायरल घ्यावे लागते. विना औषध या आजारावर नियंत्रण मिळवणे जवळजवळ अशक्य आहे, असं ते म्हणाले आहेत. 

वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार या दोन रुग्णांच्या शरीरामध्ये HIV चा कमकूवत विषाणू असण्याची शक्यता आहे. वैज्ञानिकांनी ६४ एलीट कंट्रोलर्सच्या शरीरांवर HIV संक्रमणाचा अभ्यास केला. यातील ४१ लोक अँटीरेट्रोव्हायरल औषध घेत होते. मात्र, EC2 रुग्णाने कोणतेही औषध न घेता त्याच्या शरीरातील HIV पूर्णपणे निष्क्रिय झाला आहे.

(edited by- kartik pujari)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com