हॉलिवूड निर्माता वेनस्टाइनला अटक

वृत्तसंस्था
शनिवार, 26 मे 2018

न्यूयॉर्क: जगभरात #MeToo ही चळवळ सुरू होण्यास कारणीभूत ठरलेला हॉलिवूडमधील निर्माता हार्वे वेनस्टाइन (वय 66) याला आज न्यूयॉर्क पोलिसांनी अटक केली. एका महिलेवर बलात्कार आणि आणखी एका महिलेला अनैसर्गिक संभोग करण्यास भाग पाडल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. तो आज स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाला.

वेनस्टाइनने लैंगिक अत्याचार केल्याचा जवळपास 80 महिलांनी आरोप केला होता. यामध्ये अँजेलिना जोली, सलमा हायेक यांसारख्या नामवंत अभिनेत्रींचाही समावेश आहे. या आरोपांनंतर सोशल मीडियावर जगभरात #MeToo या हॅशटॅगद्वारे लैंगिक अत्याचाराविरोधात चळवळ सुरू झाली होती. एकेकाळी हॉलिवूडमधील अत्यंत बडे प्रस्थ असलेल्या वेनस्टाइने केलेले लैंगिक अत्याचार "न्यूयॉर्क टाइम्स'ने उघड पाडल्यानंतर त्याच्याविरोधात संतापाची लाट उसळली होती. अनेक महिला कलाकारांनी उघडपणे वेनस्टाइनने त्यांच्यावर केलेल्या अत्याचाराची माहिती दिली होती. वेनस्टाइनचा गुन्हा उघड पाडणाऱ्या पत्रकाराला यंदाचा पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे.

मॉर्गन फ्रीमनकडून माफी
ऑस्कर पुरस्कारप्राप्त हॉलिवूड अभिनेते मॉर्गन फ्रीमन यांनी आज चित्रपटाच्या सेटवर महिलांशी लैंगिक गैरवर्तणूक केल्याबद्दल माफी मागितली आहे. मॉर्गन यांच्याविरोधात आठ महिलांनी तक्रार केली होती. मॉर्गन हे स्पर्शाद्वारे अथवा अश्‍लील बोलून महिलांशी गैरवर्तणूक करत असल्याचा आरोप महिला कलाकारांनी केला होता. या आरोपांनंतर फ्रीमन यांनी आज निवेदन प्रसिद्ध करत माफी मागितली आहे. "मला ओळखणाऱ्यांना माहीत आहे, की मी मुद्दामहून गैरवर्तणूक करणार नाही. मात्र, माझ्यामुळे कोणी दुखावले गेले असल्यास मी माफी मागतो,' असे त्यांनी म्हटले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hollywood producer harvey weinstein arrested