Hongkong : हाँगकाँगचे कार्यकर्ते वोंग यांना तीन महिन्यांचा कारावास

न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून हाँगकाँगचे लोकशाहीवादी कार्यकर्ते जोशुआ वोंग यांना तीन महिन्यांच्या कारावासाची सजा ठोठावण्यात आली आहे.
Hong Kong activists
Hong Kong activistssakal
Summary

न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून हाँगकाँगचे लोकशाहीवादी कार्यकर्ते जोशुआ वोंग यांना तीन महिन्यांच्या कारावासाची सजा ठोठावण्यात आली आहे.

हाँगकाँग - न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून हाँगकाँगचे लोकशाहीवादी कार्यकर्ते जोशुआ वोंग यांना तीन महिन्यांच्या कारावासाची सजा ठोठावण्यात आली आहे.

सरकारच्या विरोधात २०१९ मध्ये आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी एका पोलिस अधिकाऱ्याची वैयक्तिक माहिती उघड केल्याचा ठपका वोंग यांच्यावर ठेवण्यात आला. न्यायालयाने अशी माहिती उघड करण्यावर बंदी घातली होती. वोंग हे याआधीच तुरुंगात आहेत. त्यांच्यावर वेगवेगळे निर्बंध मोडल्याचे अनेक आरोप ठेवण्यात आले आहेत. वेगवेगळ्या निर्बंधांचा भंग केल्याचे आरोप त्यांच्यावर आहेत. वोंग २०१४ मध्ये लोकशाहीवादी निदर्शनांमुळे प्रकाशझोतात आले. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित खटल्यात ते गुन्हा मान्य करण्याची शक्यता आहे. त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते.

फेसबुकवरील माहितीमुळे अडचणीत

नोव्हेंबर २०१९ मध्ये लोकशाहीवादी कार्यकर्त्यांची पोलिसांनी नाकेबंदी केली होती. त्यावेळी एका अधिकाऱ्याने आपल्या बंदुकीतून एका आंदोलकावर तीन फैरी झाडल्या. यात एक आंदोलक जखमी झाला. सै वॅन हो या निवासी भागात हा प्रकार घडला. त्यानंतर जनतेत संतापाची लाट उसळली होती. त्या पोलिसाबाबत एका ऑनलाइन फोरमवरील माहितीचा थ्रेड वोंग यांनी फेसबुकवर रीपोस्ट केला. त्यामुळे वोंग यांना दोषी ठरविण्यात आले. ही सजा न्या. रसेल कोलमन यांनी ठोठावली. आपल्या निर्णयाची संपूर्ण कारणमीमांसा येत्या काही दिवसांत देऊ असे त्यांनी सांगितले.

हाँगकाँगच्या भवितव्याला धक्का

जोशुआ वोंग यांच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकून त्यांचा आवाज दडपण्यात आला आहे. स्वातंत्र्य आणि स्वायत्ततेची वाढत्या प्रमाणात गळचेपी होऊ लागल्यामुळे अनेक तरुण व्यावसायिकांनी इतर देशांची वाट धरली. यामुळे हाँगकाँगच्या भवितव्याला धक्का बसला आहे. पूर्वाश्रमीची ब्रिटिश वसाहत असलेला हाँगकाँग १९९७ मध्ये चीनच्या आधिपत्याखाली आला. त्यावेळी हाँगकाँगची राजकीय, सामाजिक आणि आर्थिक चौकट पन्नास वर्षे कायम राहील असे आश्वासन चीनने दिले होते, मात्र २०२० मध्ये राष्ट्रीय सुरक्षा विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यापासून या आश्वासनाला वाढत्या प्रमाणात हरताळ फासला गेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com