हाँगकाँग पोलिसांची क्रुरता; 12 वर्षाच्या मुलीविरोधात बळाचा वापर केल्याचा व्हिडिओ व्हायरल

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 7 September 2020

हॉंगकॉंगमध्ये सध्या लोकशाहीवादी आंदोलन सुरु आहे. अनेक तरुण रस्त्यावर उतरुन दडपशाहीचा विरोध करत आहे.

हॉंगकॉंग- हॉंगकॉंग पोलिसांच्या अमानुषतेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत काही पोलिस एका १२ वर्षाच्या मुलीविरोधात बळाचा वापर करताना दिसत आहेत. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून हॉंगकॉंग पोलिसांना यासाठी नागरिकांच्या रोषाचा सामना कराला लागत आहे. 

मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार ते बाजारात खरेदीसाठी गेले होते. यावेळी तेथे प्रो-लोकशाही आंदोलन होत होते. अशावेळी तेथून जात असताना पोलिसांनी त्यांना अडवलं. यावेळी त्यांची १२ वर्षाची मुलगी घाबरली आणि ती पळू लागली. यावेळी काही पोलिसांनी तिला अमानुषतेने पकडले आणि तिला जमीनीवर पाडले.

खुशखबर! रशियाने कोरोना लशी संबंधी डेटा दिला भारताला; तिसऱ्या टप्प्यातील चाचणी...

मुलीच्या आईने सांगितले की, माझी मुलगी आणि माझ्या २० वर्षाचा मुलगा खरेदीसाठी बाहेर पडलो होते. यावेळी पोलिसांनी अचानक आमच्याकडे येऊन विचारणा सुरु केली. त्यावेळी माझी मुलगी घाबरली आणि आंदोलनापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी केलेल्या झटापटीत मुलीला किरकोळ जखमा आल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय याविरोधात तक्रार दाखल करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांनीही या घटनेनंतर काही तासांनी प्रतिक्रिया दिली आहे. १२ वर्षाची मुलगी संशयीतरित्या पळत होती. त्यामुळे आम्हाला तिला अटक करावी लागली. मात्र, आम्ही कमीतकमी बळाचा वापर केला असल्याचे स्पष्टीकरण हॉंगकॉंग पोलिसांनी दिलंय.

दरम्यान, हॉंगकॉंगमध्ये सध्या लोकशाहीवादी आंदोलन सुरु आहे. अनेक तरुण रस्त्यावर उतरुन दडपशाहीचा विरोध करत आहे. चीनने हॉंगकॉंगवर आपला अंमल प्रस्थापित केला आहे. शिवाय त्यांच्या सत्तेला विरोध करणाऱ्यांना चिरड्याचं काम चालवलं आहे. याच मुळे आंदोनकर्त्यांना मोठ्या प्रमाणात अटक केली जात आहे. लोकांना एकत्र जमण्यावर बंदी घालण्यात आली आहे. रविवारी पोलिसांनी ३०० जणांना अटक केली. जवळजवळ २ हजार पोलिस शहरात तैनात करण्यात आले आहेत. 

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hong Kong police tackling 12-year-old girl caught up in protests video viral