

Hong Kong fire News
esakal
Latest Marathi News: हाँगकाँगमधील ताय पो भागातील वांग फुक कोर्ट येथे निवासी इमारत संकुलात लागलेल्या आगीचे भीषण रुप समोर येत असून मृतांचा आकडा किमान ९४ वर पोचला आहे. बुधवारी दुपारी लागलेली आग अजून पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. या संकुलातील सात इमारतींमधील शेकडो सदनिका धूर आणि ज्वाळांनी व्यापल्या असून, घटनास्थळी जातानाही अग्निशमन दलाच्या जवानांना अडचणी येत आहेत. बॅटरीच्या प्रकाशात अग्निशामक दलाचे जवान शोध व बचाव मोहीम राबवत आहेत. काही खिडक्यांमधून अजूनही धूर बाहेर पडताना दिसत आहे.