

Hormuz Strait Crisis: Crude Oil Prices May Surge to $200 Amid Global Recession Fears
esakal
वुड मॅकेन्झी या आंतरराष्ट्रीय ऊर्जा संशोधन संस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालामुळे जागतिक ऊर्जा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या अहवालानुसार, होर्मुझ सामुद्रधुनी दीर्घकाळ बंद राहिल्यास कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल २०० डॉलरपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे जगभरात गंभीर आर्थिक मंदी येण्याची शक्यता असून, भारतासारख्या मोठ्या तेल आयातदार देशांवर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो.