एका भयंकर अपघाताचा व्हिडिओ व्हायरल; त्याची काय चूक...

वृत्तसंस्था
Friday, 2 October 2020

एक व्यक्ती सिग्नलजवळ थांबली होती. दोन मोटारींचा अपघात झाला आणि जीव त्या व्यक्तीचा गेला. एका भयंकर अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्यक्तीच काय चूक? म्हणून नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

डर्बन (दक्षिण आफ्रिका): एक व्यक्ती सिग्नलजवळ थांबली होती. दोन मोटारींचा अपघात झाला आणि जीव त्या व्यक्तीचा गेला. एका भयंकर अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्यक्तीच काय चूक? म्हणून नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

Video: लहान मुलाने वाचविले आजीचे प्राण

सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक भयंकर अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन मोटारींचा अपघात झाला आहे. अपघात एवढा जबरदस्त होती की दुसऱ्या बाजूने येणारी मोटार हवेत उडून खाली आदळली. अपघात झालेली रेंज रोव्हर गाडी हवेत उडून रस्त्यावर जोरात आदळली. त्यामुळे सिग्नलजवळ थांबलेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. रेंज रोव्हरमध्ये असलेल्या तिघांना गंभीर दुखापत झाली आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका व्यक्तीने अपघाताचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावरील सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये हा अपघात कसा घडला, याचे फुटेज पाहून कारवाई केली जाणार असून, पुढील तपास करत आहोत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: horrific three car accident in durban video viral