

Ayatollah Ali Khamenei
ESakal
इराणला हादरवून टाकणारे स्फोट आणि सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्युमुळे पश्चिम आशिया पुन्हा एकदा युद्धाच्या उंबरठ्यावर आला आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यांमुळे या कृती केवळ लष्करी दबाव आहेत की, इराणमध्ये सत्ता बदलाची सुरुवात आहे असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, अचानक झालेल्या हल्ल्याचा फायदा घेण्यासाठी हल्ल्यात प्रथम खामेनेईंना लक्ष्य करणे आवश्यक होते.