
Pakistan Afghanistan War
ESakal
अफगाणिस्तानातून झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी एक निवेदन जारी केले. शाहबाज यांनी सांगितले की, पाकिस्तान आपल्या सुरक्षेशी तडजोड करणार नाही. त्यांनी तालिबान सरकारवर दहशतवादी कारवायांसाठी अफगाणिस्तानची भूमी वापरण्याची परवानगी दिल्याचा आरोप केला. पाकिस्तानी लष्कराने सांगितले की, सीमेवरील चकमकीत २३ पाकिस्तानी सैनिक मारले गेले. २९ जखमी झाले.