Apple च्या सीईओची 2021 मधील कमाई माहितेय? वाचून तुमचे डोळे विस्फारतील! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Apple CEO Tim Cook earning in 2021

Apple सीईओची 2021 मधील कमाई माहितेय? वाचून तुमचे डोळे विस्फारतील!

Apple CEO Tim Cook earning in 2021 : Apple ही जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असून टिम कुक (Apple CEO Tim Cook) हे त्या कंपनीचे सीईओ आहेत. साहजिकच आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल की टीम कुक नेमके किती पैसे कमवतात. तर याबद्दल नुकताच खुलासा करण्यात आला आहे, 2021 मध्ये, कुक यांनी एकूण $98.7 मिलीयन इतका पगार, स्टॉक्स आणि इतर पॅकेजच्या स्वरुपात कमावले आहेत. भारतीय रुपयात मोजमाप केल्यास ही रक्कम अंदाजे 733 कोटी रुपये इतकी प्रचंड आहे!

Apple चे CEO म्हणून टिम कुकच्या या कमाईमध्ये सुरक्षा आणि खाजगी विमानप्रवास यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. Apple ने त्यांच्या नवीनतम SEC फाइलिंगमध्ये CEOs च्या पगाराचे पॅकेजबद्दल माहिती जाहीर केली आहे.

टिम कुक यांचा $98.7 मिलीयन पगार हा 2020 मधील $14 मिलीयन (अंदाजे 104 कोटी रुपये) पगारापेक्षा कित्येक पटीने वाढला आहे. SEC फाइलिंगनुसार, कुक यांनी तब्बल $3 मिलीयन (अंदाजे 22.30 कोटी रुपय) बेस सॅलरी , $12 मिलीयन (अंदाजे 89.20 कोटी रुपये) कंपनीची आर्थिक आणि पर्यावरणीय स्थिरतेसंबंधी उद्दिष्टे (Financial and Environmental Sustainability goals) पूर्ण केल्याबद्दल कमावले आहेत.

तसेच त्यांना $1.39 मिलीयन (अंदाजे 10.33 कोटी रुपये) ची इतर पॅकेज मिळाले, ज्यात खाजगी जेट प्रवासासाठी $712,488 आणि सुरक्षिततेसाठी $630,630, सुट्टीसाठी $23,077 आणि त्याच्या 401(k) योजनेसाठी $17,400 चा समावेश आहे. कुक यांनी स्टॉक्समध्ये सुमारे $82.5 मिलीयन (अंदाजे 613 कोटी रुपये) कमावले. कुक यांनी त्यांची कंपनी सुरक्षेच्या कारणास्तव कमर्शियल विमानांमध्ये प्रवास करू देत नाही.

हेही वाचा: भारतात 1200 कोटींचा क्रिप्टो घोटाळा; शेकडो गुंतवणूकदारांना घातला गंडा

फायलिंगमध्ये असेही नमूद केले आहे की, Apple कंपनी 2021 मध्ये उल्लेखनीय प्रगती केली आहे. लॉकडाऊन आणि कोविड मुळे कंपनीच्या जगभरातील विक्री वर कसलाही परिमणाम झाला नाही, Apple ने कंपनीच्या उत्पन्नात सुमारे 33 टक्के वाढ नोंदवली आणि ही वाढ विक्रीच्या बाबतीत तब्बल $365 अब्ज इतकी होती.

सर्वाधिक बाजारमुल्य असलेली कंपनी

Apple अलीकडेच $3 ट्रिलियनचे बाजारमुल्य (Apple market value) असलेली पहिली कंपनी बनली आहे, ज्यामुळे या कंपनीचे उत्पन्न आता जगातील कितीतरी देशांच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेपेक्षा देखील मोठे झाले आहे. 2022 मध्ये ट्रेडिंगच्या पहिल्या दिवशी, Apple चे शेअर्स $182.88 च्या इंट्रा-डे विक्रमी उच्चांकावर पोहोचले होते, ज्याने Apple चे बाजार मूल्य $3 ट्रिलियनच्या वर पोहचले.

हेही वाचा: लस घेतल्यावर देखील अनेकांना कोरोना का होतोय, जाणून घ्या सर्वकाही

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Technologyapple
loading image
go to top