Crypto Scam : भारतात 1200 कोटींचा क्रिप्टो घोटाळा; शेकडो गुंतवणूकदारांना घातला गंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cryptocurrency

भारतात 1200 कोटींचा क्रिप्टो घोटाळा; शेकडो गुंतवणूकदारांना घातला गंडा

crypto scam in India : सध्या भारतात क्रिप्टोकरंसीजनध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढत आहे, या दरम्यान देशात एक बनावट क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) घोटाळा समोर आला आहे. गुंतवणूकदारांची नवीन क्रिप्टोकरन्सीच्या नावावर शेकडो कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले असून ED ने या घोटाळ्याची चौकशी सुरु केली आहे. या घोटाळ्यामध्ये सुमारे 900 लोकांकडून 1200 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा उघड झाले आहे. ED कडून याबाबत खुलासा करण्यात आला आहे.

या घोटाळ्याच्या संदर्भात देशात अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. या प्रकरणाचा मास्टरमाईंड समजला जाणार केरळमधील एक व्यक्ती देशातून पळून गेलेला असून त्याच्यावर मनी लाँड्रिंगचे खटले सुरू आहेत. ईडीने एका दक्षिणात्य चित्रपट अभिनेत्याच्या घरावरही छापे टाकले आहेत. मात्र अभिनेत्याने या छाप्यांचा क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याशी कोणताही संबंध नाकारला आहे. इनिशियल कॉईन ऑफरिंग (IOC) च्या नावाखाली ही फसवणूक करण्यात आली आहे . 2020 मध्ये लॉकडाऊन दरम्यान फसवणूक झालेल्यांपैकी बहुतेक लोकांनी “Morris Coin” हे बनावट कॉईन विकत घेतले होते.

हेही वाचा: Jio चा सगळ्यात स्वस्त प्लॅन, 400 पेक्षा कमीत 84 दिवस व्हॅलिडिटी

नेमका कसा झाला घोटाळा

ईडीने दिलेल्या माहितीवरुन, इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचे वृत्त दिले त्यानुसार, बनावट क्रिप्टोकॉइन "मॉरिस कॉईन" 2020 मध्ये कोईम्बतूर-येथील क्रिप्टोक्रेन्सी एक्सचेंज Franc Exchange मध्ये लिस्ट करण्यात आले होते. IPO प्रमाणेच ते लोकांसमोर सादर केले गेले. 10 मॉरिस कॉईनची किंमत 15,000 रुपये ठेवण्यात आली होती आणि त्याचा लॉक-इन कालावधी 300 दिवसांचा होता. गुंतवणूकदाराला एक ई-वॉलेटही देण्यात आले. या बनावट क्रिप्टोकरन्सीच्या प्रमोटरने गुंतवणूकदारांना या कॉईनची किंमत लवकर असल्याचे असल्याचे आमिष दाखवण्यात आले

सुरुवातीला Long Rich Technologies, Long Rich Trading आणि Long Rich Global सारख्या कंपन्यांनी सुरुवातीला ऑनलाइन एज्युकेशन अॅप असल्याचे सांगून गुंतवणूकदारांना आकर्षित केले गेले. त्यानी नंतर मॉरिस कॉईन स्वतःची क्रिप्टोकरन्सी असल्याचे सांगून दावा केला की ते क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजमध्ये लिस्टेड आहे. याशिवाय काही दिवसात पैसे दुप्पट करण्याच्या स्किम सांगून गुंतवणूकदारांकडून पैसै घेतले गेले.

हेही वाचा: लष्करी छावणीत घुसण्याचा प्रयत्न, नाशिकमध्ये पुन्हा तोतया मेजर गजाआड

ईडीच्या सूत्रांचे सांगीतले की, घोटाळेबाजांनी गुंतवणूकदारांकडून घेतलेल्या पैशातून रिअल इस्टेटमध्ये बेकायदेशीरपणे गुंतवणूक केली. सर्वाधिक गुंतवणूक केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये झाली आहे. गुंतवलेल्या रकमेचा स्रोत त्यांनी उघड केला नाही. ईडी गेल्या अनेक दिवसांपासून केरळ, तामिळनाडू आणि दिल्लीत छापामारी कारवाई करत आहे. छापे टाकण्यात आलेल्यांमध्ये बेंगळुरूस्थित लाँग रिच टेक्नॉलॉजीज आणि मॉरिस ट्रेडिंग सोल्युशन्सचा समावेश आहे.

EDने उन्नी Unni Mukundan Films Pvt. Ltd वरही छापा टाकला आहे. ही फर्म मल्याळम अभिनेते उन्नी मुकुनंदन आणि नेक्स्टल ग्रुप यांच्या मालकीची आहे. मुकुनंदन यांनी मात्र बनावट क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याशी कोणताही संबंध नसल्याचे सांगीतले असून ईडीने त्यांच्या वेंचर्स मध्ये गुंतवलेल्या निधीच्या स्रोताबाबत चौकशी केली असल्याचे सांगीतले.

हेही वाचा: फोनमध्ये इंटरनेट नसताना देखील करा डिजिटल पेमेंट, जाणून घ्या पध्दत

मास्टरमाईंड फरार

ईडी या सर्व घोटाळ्याच्या मागे केरळच्या मल्लापुरम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या निषाद नावाचा तरुण असल्याचे सांगीतले . अभिनेता मुकुनंदनचे निषादसोबत संबंध असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी पोलिसांनी निषादविरुद्ध कन्नूर आणि मल्लापूरमध्ये चिटफंड योजना चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. निषादला पोलिसांनी अटक केली, मात्र जामिनावर सुटल्यानंतर तो देश सोडून गेला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Crypto currency
loading image
go to top