अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना किती पगार मिळतो माहिती आहे का?

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 8 November 2020

जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यामध्ये जो बायडेन यांनी  विजय मिळवला असून डोनाल़्ड ट्रम्प यांचा पराभव झाला आहे.

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर बायडेन यांनी बाजी मारली. डेमोक्रेटिक पार्टीचे जो बायडन आणि रिपब्लिकन पार्टीचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सध्या मोठी चुरस लागली होती. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जगातील सर्वाधिक पावरफुल मानले जातात. या लेखात आपण  अमेरिकन राष्ट्राध्यक्षांबद्दल काही विषेश बाबी जाणून घेणार आहोत.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षला किती पगार असतो-
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षला वर्षाला 4 लाख डॉलर म्हणजेच 2.9 कोटी रुपये पगार मिळतो. तसेच विविध भत्तेदेखील अमेरिकेन राष्ट्राध्यक्षाला मिळत असतात. त्याचबरोबर पदावर असेपर्यंत व्हाईट हाऊसमध्ये राहणे, प्रवासासाठी स्वतःचे विमान, हेलिकॉप्टर यांसारख्या सुविधा देखील मिळत असतात. महत्वाचे म्हणजे पदावरून पायउतार झाल्यानंतर राष्ट्राध्यक्षला पेन्शन मिळत राहते. याचा सर्व खर्च सरकारी तिजोरीतूनच होत असतो.

विविध भत्ते- 
वर्षाच्या पगारासोबत अमेरिकन अध्यक्षाला 50 हजार डॉलर म्हणजे 40 लाख रुपये भत्ता मिळत असतो. तसेच 1 लाख डॉलर प्रवासावर खर्च करू शकतात. विशेष म्हणजे त्यांना कोणताही कर द्यावा लागत नाही. तसेच मनोरंजन भत्ता म्हणून अध्यक्षांना 14 लाख रुपये मिळतात. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे अमेरिकन राष्ट्रपतींच्या पगारावर टॅक्स घेतला जातो पण त्यांना देण्यात येणाऱ्या भत्त्यांवर कोणताही टॅक्स लागत नाही.

अमेरिकीचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांचे कुटुंबीय डिझायनरकडून कोणतेही कपडे गिफ्टमध्ये घेत नाहीत. जरी त्यांनी ते घेतले तर एकदा घातल्यानंतर ते कपडे सरकारच्या संग्रहालयामध्ये जमा केले जातात.

पगार वाढला-
यापुर्वी 2001 मध्ये अमेरिकन अध्यक्षांचा पगार 2 लाख डॉलर म्हणजेच 1.45 कोटी रुपये होता. त्यानंतर काँग्रेसने यामध्ये वाढ करून 50 हजार डॉलर एक्सपेन्सेस अलाउंस म्हणून दिला. नंतर पगार वाढून तो वर्षाला 2.9 कोटी केला. परंतु उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांच्यासाठी ही खूपच छोटी रक्कम आहे. काही दिवसांपुर्वी आलेल्या फोर्ब्सच्या यादीनुसार ट्रम्प यांच्याकडे 3.1 बिलियन डॉलर इतकी संपत्ती आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षासाठी व्हाईट हाऊस हे त्यांचे अधिकृत निवासस्थान आहे. हे निवासस्थान 1792 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला हे देण्यात आलं होतं. व्हाईट हाऊसमध्ये सहा मजले असून 132 खोल्या आहेत.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how much salary have to United State of America