ट्रम्प सध्या काय करतात? मेलानिया यांनी दिली माहिती

donald trump white house
donald trump white house

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड़ ट्रम्प यांना पराभवाचा धक्का बसला. हा पराभव जिव्हारी लागलेल्या ट्र्म्प यांनी नव्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीला उपस्थिती लावली नव्हती. बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्याच्या काही तास आधीच ट्र्म्प फ्लोरिडातील मार ए लागो इथल्या त्यांच्या निवासस्थानी गेले होते. तेव्हापासून ट्र्म्प आणि त्यांचे कुटुंबिय तिथंच राहत आहेत. ट्रम्प यांच्या माजी सल्लागाराने मेलानिया ट्रम्प यांच्या हवाल्यानं म्हटलं की, राष्ट्राध्यक्षपदावरून पायऊतार झाल्यानंतर ट्र्म्प यांच्या आय़ुष्यात बराच बदल झाला आहे. 

अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मेलानिया ट्र्म्प यांना वाटतं की, ट्र्म्प व्हाइट हाउसच्या तुलनेत इथं जास्त आनंदी आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आता ट्विटरवर नसल्यानंसुद्धा खूष आहेत. ट्र्म्प यांनी वादग्रस्त ट्विट केल्यानं ट्विटरने त्यांच्यावर कारवाई केली होती. 

जेसन मिलर यांनी सांगितलं की, महाभियोग सुरू असतानाही इतक्या वर्षात ट्र्म्प यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. अमेरिकेच्या इतिहासात फक्त 45 लोक आहेत ज्यांना माहिती आहे की जगाचं ओझं खांद्यावर घेऊन फिरणं कसं असतं. जेव्हा तुम्हाला चार वर्षांनी माहिती होतं की, आता सर्व काही तुमची जबाबदारी नाही. त्यामुळे तुम्ही मोकळा श्वास घेऊ शकता. मिलर यांच्या माहितीनुसार, ट्र्म्प यांचे म्हणणे आहे की, सोशल मीडियावर नसणे आणि तिरस्काराने भरलेल्या सोशल मीडियावर चर्चेत न येणं प्रत्यक्षात चांगलं आहे.

ट्रम्प यांचे ट्विटरवर जवळपास 8 कोटी 80 लाख फॉलोअर्स होते. काही आठवडे आधी मायक्रोब्लॉगिंग साइटवरून त्यांचे खाते डिलिट करण्यात आले होते. कॅपिटल हिलमध्ये 6 जानेवारीला त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला होता. या घटनेनंतर ट्विटरने ट्रम्प यांच्यावर कारवाई केली होती. 

नव्या वातावरणात मेलानिया ट्रम्पसुद्धा आनंदी आहेत. मेलानिया यांनी म्हटलं की, ट्रम्प आता आधीपेक्षा आनंदी असल्याचं पाहून खूप बरं वाटतं. आधीच्या तुलनेत ते सध्या एन्जॉय करत आहत. तसंच त्यांना अभिमान आहे की, अमेरिकेच्या इतिहासात ट्रम्प यांचा कार्यकाळ सर्वाधिक यशस्वी राहिला. मेलानिया यांना विश्वास वाटतो की ट्रम्प महाभियोगामध्ये निर्दोष सुटतील. त्यांना दोषी ठरवलं जाण्याची शक्यता नाही. तसंच यासाठी कोणत्याही प्रकारचा दबाव नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com